रावेर (राहुल डी गाढे) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर,रावेर येथील सिद्धार्थ,फुले,आंबेडकर व्यायाम शाळा यांची बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती गठित करण्यात आली. सिद्धार्थ फुले आंबेडकर व्यायाम शाळा अध्यक्ष पदी-शुभम घेटे , उपाध्यक्ष - संकीत तायडे , सचिव- रुपेश गाढे ,खजिनदार- मनोज घेटे ,यांची नेमणूक करण्यात आली. याप्रसागी सिद्धार्थ फुले आंबेडकर व्यायाम शाळा मंधील सर्व खेळाडू आणि आदी समाज बांधव यावेळी उपस्थित होते.



