पुणे (सुवर्ण दिप वृत्तसेवा)
पुण्यात पोलीस भरती सुरू असताना धावताना हृदयविकाराच्या झटक्याने तरूणाचा मृत्यू झाला आहे. पुण्यात पोलीस भरती दरम्यान तरुणाचा मृत्यू झाला आहे. पुणे शहरातील शिवाजीनगर पोलीस ग्राउंडवर ही घटना घडली आहे. पोलीस भरती सुरू असताना धावताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. पोलिस भरती व्हावे असे अनेक तरुण तरुणींचे स्वप्न असते. त्यासाठी अनेकजण कठोर मेहनत देखील घेतात. मात्र, खूप कमी लोकांना पोलिस नोकरी करण्याची संधी मिळते.
(ads)
राज्यात पोलीस भरतीच्या जागा कमी असल्याने अनेक स्पर्धात्मक वातावरण पाहायला मिळते आहे. अशात आता पुण्यात पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पुरुषोत्तम बुरकुले असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो पोलिस भरती प्रक्रियेसाठी पुण्यात आला होता. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात उष्णतेचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे हा मृत्यू झाला आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ग्रामीण भागात बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर अनेक तरुण पोलीस भरतीची तयारी करतात.
(ads)
पोलीस भरतीच्या तयारीसाठी तालुका पातळीवर जागोजागी अकॅडमी सुरू झालेल्या दिसून येतात. धावण्याच्या स्पर्धेत सहभागी होण्याआधी उमेदवारांनी काही प्राथमिक वैद्यकीय तपासण्या करणे गरजेचे आहे. जसे की हेमोग्लोबिन लेव्हल, ब्लड प्रेशर, हृदयाचे ठोके आणि ईसीजी इत्यादी, असे तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले आहे. ज्या दिवशी धावण्याची स्पर्धा असते, त्या दिवशी शरीरातील पाण्याची पातळी म्हणजेच हायड्रेशन नॉर्मल ठेवणे गरजेचे असते.
(ads)
उन्हामध्ये बराच वेळ उभा राहिल्यामुळे किंवा धावल्यामुळे डिहायड्रेशनचा धोका असतो. त्याचप्रमाणे शरिरातील इलेक्ट्रॉईटची पातळी देखील खालावते. या सर्व गोष्टींचा हृदयावर विपरित परिणाम होऊन बीपी कमी होणे किंवा हृदयविकाराचा झटका येणे, याचा धोका वाढतो, असेही डॉक्टरांनी म्हटले आहे. पुण्यातील पोलीस भरती प्रक्रिये दरम्यान तरुणाचा मृत्यू झाल्याप्रकरणात अधिक तपास शिवाजीनगर पोलिस करत आहेत.



