वाकोद येथे सम्राट अशोक जयंती उत्साहात साजरी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


जामनेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : तालुक्यातील वाकोद येथे भारतीय बौद्ध महासभा भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा अंतर्गत जामनेर तालुका च्यावतीने धम्मसंस्थेच्या ट्रस्टी केंद्रीय कार्यकारिणी कार्यालयाच्या वतीने जीवनात कोणतेच युद्ध न हरणारा प्रियदर्शी चक्रवर्ती राजा सम्राट अशोक यांची जयंती वाकोद येथील "नालंदा बुद्ध विहार" येथे मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली.

(ads)

 यावेळी सर्व प्रथम तथागत भगवान गौतम बुद्ध, डॉ बाबासाहेब आंबेडकर व चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करण्यात आले यानंतर विनम्र अभिवादन सभा घेण्यात आली . या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी -चंद्रकांत इंगळे (ता अध्यक्ष) तर प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शन जिल्हा शाखा पदाधिकारी -प्रकाश सरदार (केंद्रीय शिक्षक), वसंतदादा लोखंडे (केंद्रीय शिक्षक)भारतीताई तायडे (केंद्रीय शिक्षिका) व्ही के भालेराव सर, दिनकर सुरळकर सर तालुका शाखेचे पदाधिकारी दशरथ संध्यान ता (सरचिटणीस), माणिकराव लोखंडे (ता उपाध्यक्ष), युवराज अहिरे (ता आडिटर) मुकुंदा सोमवंशी (कार्या सचिव), रतन साळवे, युवराज मगरे, सुभाष सुरवाडे ( ता संघटक) तसेच यावेळी दहा दिवशीय उपासिका धम्म प्रशिक्षण शिबिरातील शिबीरार्थी तसेच या धम्मनगरीतील श्रद्धावान बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(ads)

 सदर प्रसंगी पहुर येथील प्रज्ञा सुर्य हितकारणी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने येथे दहा दिवशीय उपासिका धम्म प्रशिक्षण शिबिरातील शिबीरार्थी यांच्यासाठी फलहार देण्यात आला.

उपस्थित प्रमुख मान्यवरांनी सम्राट अशोक ऐतिहासिक लेण्या व त्यावरील बुद्धाचा संदेश त्यांनी जगात शीला लेख लिहून धम्माचा प्रसार व प्रचार केला.त्याकाळात केलेली धम्माची महत्वची शिकवण सांगण्यात आली.

 कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांना खिरदाना करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक वसंतदादा लोखंडे (जिल्हा सचिव) तर आभार प्रदर्शन दशरथ संध्यान (ता सरचिटणीस) यांनी केले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!