रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : जळगाव जिल्हा रावेर तालुक्यातुन मध्य प्रदेशाच्या सिमेला जोडल्या जाणाऱ्या बुऱ्हाणपुर - अंकलेश्वर महामार्गाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नांव देण्यात यावे तसेच रावेर शहरात महिलांकरिता ठिकठिकाणी स्वच्छतागृह उभारण्यात यावे या मागणि करिता निळे निशाण सामाजिक संघटनेच्या वतीने दि. २३ मार्च २०२६ पासुन रावेर तहसिलदार कार्यालया समोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात आले होते.
(ads)
परंतु शासन प्रशासनाने आंदोलनाची संत गतिने घेतलेल्या भुमिके मुळे निळे निशाण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यांनि दि. २६ मार्च पासुन अन्न पाण्याचा त्याग केल्यामुळे संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अक्रोष निर्माण झाल्याने शासन प्रशासनाच्या हल्यालिंना वेग आला व नगरपरिषदेने तात्काळ सर्वसाधारण सभेचे आयोजन करून एन. एच. ए. आयच्या संमति नुसार बुऱ्हाणपुर अंकलेश्वर महामार्गाला अधिकृतरित्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नांव देण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला असून आनंद बाविस्कर यांचे सह संघटनेच्या सर्व पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी शासन प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले.
(ads)
आनंद बाविस्कर यांनी नायब तहसिलदार संजय तायडे व नगरपालिका मुख्यअधिकारी अविनाश गांगोडे यांचे आभार मानले व उपोषणाची सांगता केली. यावेळी मनोगत व्यक्त करताना त्यांनी सांगितले की, निळे निशाण संघटनेला मिळालेले यश हे फक्त यश नाही तर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नांवाचा आम्हाला मिळालेला गौरव आहे. शेकडो समाज बांधवांच्या साक्षीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात भिमसैनिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा जयघोष करीत फटाके व ढोल ताशाच्या गजरात जल्लोष साजरा केला.
(ads)
त्या प्रसंगी नगरसेविका अनिता तायडे, माजि नगरसेवक जगदिश घेटे, अॅडव्होकेट दिपक तायडे, पंकज वाघ संघरक्षक तायडे, सावन मेढे, प्रदिप सपकाळे, हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता संघटनेचे सदाशिव निकम, संजय तायडे, विलास तायडे, महेंद्र कोचुरे, नारायण सवर्णे, विक्की जाधव, उदय वाघ, गोकुळ रायमळे, विशाल तायडे, विठ्ठल गाढे, महेंद्र कावडकर, अक्षय इंगळे, दिनेश ससाणे, मोहन ससाणे, आकाश निकम, अर्जुन तायडे, नंदा बाविस्कर, संगिताबाई घेटे, सुशिला बाविस्कर, अल्का जाधव, उज्वला बाई वाघ, संध्या बाई अटकाळे व इतर कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.



