चोपडा (सुवर्ण दिप वृत्तसेवा)
जळगाव जिल्ह्यात लहान बालिकेला जंगली प्राण्याने ठार केल्याची घटना घडली आहे. वन विभागाच्या विरोधात नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. रात्री आईच्या कुशीत झोपलेल्या लहान बालिकेला मारल्याची घटना समोर आली आहे. जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात ही खळबळजनक घटना घडली आहे. यात रात्रीच्या वेळेस आईच्या कुशीत झोपलेल्या लहान बालिकेस जंगली प्राण्याने पळवुन नेत ठार केल्याची घटना घडली आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीपासून राजस्थान तसेच गुजरातमधील काठेवाडी गुरे चरण्यासाठी जळगाव जिल्ह्यात येत असतात.
(ads)
अशाच घटनेत चोपडा तालुक्यात शेत शिवारात हजारो गाईंचा कळप घेऊन गुराखी शेत शिवारात मुक्कामी आहेत. यावेळी ध्रुवी विपुल बरवाड ही लहान बालिका रात्रीच्या वेळेस आईच्या कुशीत झोपलेली असताना, अज्ञात जंगली प्राण्याने तिला उचलून नेत तिला ठार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेने परप्रांतीय गुराखीमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेने जळगावात अजूनही लहान बालकांचे बळी जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. वन विभागाने तातडीने या जंगली प्राण्याचा शोध घेऊन त्याला जेरबंद करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. कारण लहान बालकांचे बळी जाण्याची भीती आहे.
(ads)
यामुळे परिसरातील नागरिकांनी वनविभागाविरोधात संताप व्यक्त केला आहे. या घटनेची गंभीर दखल पोलिसांनी घेतली आहे. या घटनेबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मात्र या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील मामलदे गावाच्या जंगलात अनेक प्राण्यांचे वास्तव्य आहे. त्यातीलच एखाद्या प्राण्यांने लहान बालिकेला खाटेवरून उचलून नेल्याचा आणि मारल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
(ads)
या प्रकरणी चोपडा शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी सांगितले आहे, यारप्रकरणत तपास सूरू आहे. अलीकडच्या काळात जळगाव जिल्ह्यातील जंगल परिसरात घडलेल्या बिबट्याच्या हल्ल्यात आतापर्यंत बरेच जनावरे जखमी आणि मृत झाले आहेत. सोबतच मनुष्यहानीची घटना घडत असल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहे. या घटनेत अधिक तपास चोपडा पोलिस करत आहेत.



