रावेर तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपले ; शेकडो हेक्टरवरील केळीच्या बागा जमीनदोस्त : तातडीने पंचनामे करण्याच्या आमदार अमोल जावळे यांच्या प्रशासनाला सूचना

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

संग्रहित चित्र

रावेर तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपले ; शेकडो हेक्टरवरील केळीच्या बागा जमीनदोस्त : तातडीने पंचनामे करण्याच्या  आमदार अमोल जावळे यांच्या प्रशासनाला सूचना

 रावेर (राहुल डी गाढे) : रावेर तालुक्यात आज संध्याकाळी सव्वा सातच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने तडाखा दिला आहे. कापणीला आलेल्या शेकडो हेक्टरवरील केळी बागांचे या पावसामुळे अतोनात नुकसान झाले आहे. केळी बागांच्या नुकसानीचा आकडा कोटींच्या घरात असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी.

(ads)

कालपासून रावेर तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. तर आज अक्षरशः वादळी पावसाने तालुक्याला जोरदार तडाखा दिला आहे. जोरदार वादळी वाऱ्यामुळे कापणीला आलेल्या केळी बागा मोडून पडल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. हातातोंडांशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला असून शेतकऱ्यांसमोर यामुळे मोठे संकट निर्माण झाले आहे.

 हेही वाचा : लहान बालिकेला जंगली प्राण्याने केले ठार :  जळगाव जिल्ह्यातली घटना, वन विभागाच्या विरोधात नागरिकांचा संताप

 सुमारे पाऊन तास विजांच्या कडकडाटासह पावसाचा तडाखा सुरु होता. पावसामुळे वीज पुरवठा खंडीत झाला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

(ads)

उद्यापासून पंचनामे : आमदार जावळे

वादळी पावसाने केळी बागांच्या झालेल्या नुकसानीचे उद्यापासून तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना आमदार अमोल जावळे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. पंचनाम्याचा अहवाल शासनाला प्राप्त झाल्यावर नुकसानग्रस्त केळी उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याची माहिती आमदार अमोल जावळे यांनी दिली.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!