ऐनपुर परिसर शिक्षण प्रसारक मंडळाने चालवलेले सरदार वल्लभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय ऐनपूर येथे गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव मार्फत गांधी विचार संस्कार परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.२८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. प्राचार्य डॉ.जे. बी अंजने यांनी परीक्षेचे महत्त्व पटवून दिले तसेच गांधी विचारांची आजच्या स्थितीत विद्यार्थ्यांना व देशाचे प्रत्येक तरुण-तरुणीला अत्यंत आवश्यकता आहे असे मत मांडले. परीक्षेचे आयोजन या मंडळाचे समन्वयक प्रा डॉ पी.आर. गवळी यांनी केले होते. प्रा. प्रदीप तायडे व प्रा. अक्षय महाजन यांनी परीक्षेचे काम पाहिले. गांधी रिसर्च फाउंडेशन तर्फे नुकताच जिल्हास्तरीय निकाल जाहीर करण्यात आला आहे. या निकालामध्ये महाविद्यालयाची टी.वाय.बी.ए ची विद्यार्थिनी कुमारी गवळी ऋतिका सुरेश हिने जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकाविला. या विद्यार्थिनीला गांधी रिसर्च फाउंडेशन तर्फे रजतपदक व स्मृतीचिन्ह देण्यात आले. तसेच प्रथम वर्ष विज्ञान शाखेचा विद्यार्थी भालेराव कुणाल विनोद या विद्यार्थ्यांचा जिल्ह्यात तृतीय क्रमांक मिळाला याला कांस्य पदक प्राप्त झाले.या यशाबद्दल ऐनपूर परीसर शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन श्रीराम पाटील, अध्यक्ष श्री.भागवत पाटील, उपाध्यक्ष श्री.आर.एन महाजन,सेक्रेटरी श्री संजय वामन पाटील व सर्व संचालक मंडळाने अभिनंदन व कौतुक केले तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे.बी.अंजने, प्रा.डॉ.जे.पी.नेहेते व सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
गांधी विचार संस्कार परीक्षेमध्ये ऐनपूर महाविद्यालयाचे यश
शुक्रवार, मार्च ०६, २०२६



