ऐनपूर महाविद्यालयात हस्त कला कौशल्य विकास कार्यशाळा संपन्न

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


ऐनपूर: येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात युवती सभा व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ विद्यार्थी विकास विभागामार्फत आत्मनिर्भर अभियानांतर्गत हस्त कला कौशल्य विकास कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.  कार्यशाळेच्या अध्यक्षपदी व उद्घाटक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जे बी अंजने  होते. या कार्यशाळेत कोमल परदेशी यांनी विविध हस्त कला यांचे मार्गदर्शन केले व प्रतीक्षिक करून विद्यार्थिनी कडून करून घेतले. या कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा हेमंत बाविस्कर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा ऋतुजा पाटील यांनी केले. या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी प्रा वैष्णवी पाटील, प्रा कोमल सुतार, श्री श्रेयस पाटील श्री हर्षल पाटील यांनी मेहनत घेतली

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!