ऐनपूर:सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय ऐनपूर येथे राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय महिला दिना निमित्ताने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या व्याख्यानाचे प्रमुख व्यक्ते महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे महत्त्व सांगितले .हा दिवस केवळ उत्सवाचा नाही, तर स्त्रियांच्या संघर्ष, कर्तृत्व आणि सन्मानाचा दिवस आहे. समाजाच्या उभारणीत स्त्रीचे योगदान अमूल्य आहे. घर, समाज आणि राष्ट्र या तिन्ही पातळ्यांवर स्त्रीने आपली प्रतिभा आणि सामर्थ्य सिद्ध केले आहे.
(ads)
भारतीय संस्कृतीत स्त्रीला नेहमीच शक्ती, माया आणि करुणेचे प्रतीक मानले गेले आहे.असे प्रतिपादन त्यांनी केले.सावित्री बाई फुले, बहिणाबाई चौधरी,कल्पना चावला,अरुणीमा सिन्हा,निरजा भनोट, जिजाऊ, या महान स्त्रीयांच्या जीवन कार्यातून प्रेरणा घेऊन आपण वाटचाल केली पाहिजे. केवळ एक दिवस नाही तर कायम स्त्रियांचा सन्मान केला पाहिजे त्यांना समान वागणूक दिली पाहिजे.त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव केला पाहिजे असे मत मांडले.तसेच डॉ. जे.पी. नेहेते यांनी विद्यार्थिनींना सर्व क्षेत्रात सहभाग घेण्याचे आवाहन केले.
(ads)
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. व्ही. एन. रामटेके यांनी केले.कार्यक्रमाला विद्यार्थी- विद्यार्थिनी, प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजना मध्ये प्रा. एच.एम. बाविस्कर, डॉ. व्ही. एन. रामटेके, प्रा. एस.पी. उमरीवाड, उपप्राचार्य डॉ. एस. एन. वैष्णव डॉ. पी. आर. महाजन, डॉ. पी. आर. गवळी, प्रा. व्ही, एच, पाटील,प्रा. प्रदीप तायडे, प्रा. ज्ञानेश्वर कोळी,प्रा. भोपे, प्रा संकेत चौधरी, प्रा. केतन बारी, प्रा. अंकुर पाटील प्रा. वैष्णवी पाटील ,प्रा कोमल सुतार यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे आभार प्रा. कोमल सुतार यांनी केले. शेवटी अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.



