विवरे खुर्द ता.रावेर (राहुल डी गाढे) : रावेर तालुक्यातील विवरे खुर्द येथील अमोल मुरलीधर गाढे यांची मुंबई लोहमार्ग पोलिस दलात निवड झाली आहे. आई वडील यांनी मोल मजुरी करून अमोल ला इयत्ता बारावी पर्यंतचे शिक्षण दिले. अमोल ने ही मनात देशसेवा करण्याचे आधी पासूनच ठरवले होते व मोठ्या जिद्दीने आणि मोठ्या चिकाटीने गेल्या दोन वर्षापासून संध्याकाळी 2 तास तो ग्राउंड वर जाऊन प्रॅक्टिस करायचा.
(ads)
आणि दिनांक १6 एप्रिल रोजी निकालाची यादी प्रसिद्ध होताच त्यात त्यांचे नाव पाहताच त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.शेवटी त्याने घरी सांगताच त्याच्या आई वडिलांचे मन भरून येऊन त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रु आले. त्याला आलेल्या यशात त्यांच्या आई वडिलांचा मोलाचा वाटा आहे.
(ads)
अमोल ला आलेल्या यशाबद्दल त्याची विवरे गावातून मिरवणूक ही काढण्यात आली. आणि अमोल वर चहूबाजूने शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. जिद्द आणि चिकाटी असली की यश हे मिळतेच हेच अमोल च्या यशातून आपल्या पहायला मिळाले.







