जळगाव जिल्हा प्रतिनिधी (नितीन इंगळे)
जामनेर शहरात भीषण अपघाताची घटना समोर आली असून, एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. बोदवड रस्त्यावरील नर्सरी जवळ ही घटना घडली आहे.
अपघात इतका भीषण होता की दुचाकीस्वाराला जीव वाचवण्याची कोणतीही संधी मिळाली नाही. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तात्काळ मदत करण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. प्राथमिक माहितीनुसार, दुचाकीचा क्रमांक MH 19 BB 5188 असा आहे.
(ads)
अपघातातील ठार झालेल्या तरुणाची ओळख अखेर पटली
जामनेर शहरातील बोदवड रस्त्यावरील नर्सरी जवळ झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेत मृत व्यक्तीची ओळख आता पटली आहे.मृत तरुणाचे नाव विजय शिवाजी इंगळे असे असून, तो नाद्रा हवेली येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.
पूर्ण व्हिडिओ पहा : महिलेने अख्खा भाजपा हादरवला... वाहतूक कोंडीत अडकलेली महिला भाजपाच्या गिरीश महाजनांवर भडकली...
अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पुढील तपास सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.








