रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : भारत मुक्ती मोर्चा आणि राष्ट्रीय पिछडा मोर्चा यांच्या वतीने येत्या २३ एप्रिल रोजी देशव्यापी भारत बंदची हाक देण्यात आली आहे. या आंदोलनाचे नेतृत्व भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष बहुजन नायक मेश्राम तसेच राष्ट्रीय पिछडा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष चौधरी विकास पटेल करीत आहेत.
(ads)
या बंदच्या पार्श्वभूमीवर विविध सामाजिक व शैक्षणिक मुद्यांवर केंद्र सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात येणार असून, केंद्र सरकारने ओबीसींची जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला असला, तरी जनगणनेच्या अधिसूचनेत ओबीसींसाठी स्वतंत्र जात कॉलम समाविष्ट करण्यात आलेला नाही.घोषणेनंतरही ही अंमलबजावणी न केल्यामुळे ओबीसी समाजाचा विश्वासघात झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे सुरू होणाऱ्या राष्ट्रीय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम समाविष्ट करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
(ads)
एससी, एसटी आणि ओबीसी प्रवर्गांच्या शैक्षणिक हक्कांसाठी यूजीसी इक्विटी रेग्युलेशन लागू करण्याच्या समर्थनार्थ मागणी, २०११ पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा मधून सूट देण्यात यावी, अशी मागणी. वरील सर्व मागण्यांसाठी २३ एप्रिल रोजी राष्ट्रव्यापी भारत बंद पुकारण्यात आला असून, नागरिकांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष महेश तायडे यांनी केले आहे.







