श्रीकांत धिवरे जळगाव चे नवीन पोलिस अधीक्षक ; डॉ.महेश्वर रेड्डी यांची बदली

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरू असताना राज्यातील ९ जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या बदल्यांचा निर्णय घेण्यात आला. राज्याचे गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा निर्णय घेतला. यामध्ये जळगाव जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची बदली करण्यात आली आहे. 

(ads)

त्यांच्या जागी धुळे जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांची जळगावच्या नव्या एसपीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ढिवरे हे अनुभवी अधिकारी असून, त्यांच्या नेतृत्वाखाली जळगाव जिल्ह्यात पोलिस प्रशासन अधिक सक्षम होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या बदल्यांमध्ये सातारचे वादग्रस्त पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांचेही बदली आदेश आहेत. दोशी यांची सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली आहे. पुण्याचे पोलीस उपायुक्त निखील पिंगळे हे सातारचे नवे पोलीस अधीक्षक असणार आहेत. पुण्याचे दुसरे पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांची वाशीम जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

(ads)

याशिवाय कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक योगेश गुप्ता यांची पोलीस उपमहानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र येथे बदली झाली आहे. त्यांच्या जागी गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांची बदली झाली आहे. धुळ्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांची जळगावचे पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली आहे. तर जळगावचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांची पुणे येथे राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे.

(ads)

बदली झालेल्या अधिकाऱ्यांची नावे :

१. निखिल पिंगळे : पोलिस उपायुक्त, पुणे ते पोलिस अधीक्षक, सातारा.

२. राजकुमार शिंदे : पोलिस उपायुक्त, पुणे ते पोलिस अधीक्षक, वाशीम.

३. महेश्वर रेड्डी : पोलिस अधीक्षक, जळगाव ते पोलिस अधीक्षक, सीआयडी पुणे.

४. तुषार दोशी : पोलिस अधीक्षक, सातारा ते पोलिस अधीक्षक, सांगली.

५. संदीप घुगे : पोलिस अधीक्षक, सांगली ते पोलिस उपायुक्त (सुरक्षा), राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई.

६. योगेश गुप्ता : पोलिस अधीक्षक, कोल्हापूर ते पोलिस उपमहानिरीक्षक, गडचिरोली परिक्षेत्र.

७. नीलोत्पल : पोलिस अधीक्षक, गडचिरोली ते पोलिस अधीक्षक, कोल्हापूर.

८. एम. रमेश : अतिरिक्त पोलिस अधीक्षक, गडचिरोली ते पोलिस अधीक्षक, गडचिरोल.

९. श्रीकांत धिवरे : पोलिस अधीक्षक, धुळे ते पोलिस अधीक्षक, जळगाव.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!