चिनावल ग्रामपंचायतीवर काँग्रेस प्रणित 'ग्रामविकास पॅनल'चे निर्विवाद वर्चस्व : अनिता भालेराव यांची बिनविरोध निवड

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 चिनावल ग्रामपंचायतीवर काँग्रेस प्रणित 'ग्रामविकास पॅनल'चे निर्विवाद वर्चस्व : अनिता भालेराव यांची बिनविरोध निवड


चिनावल ग्रामपंचायतीवर काँग्रेस प्रणित 'ग्रामविकास पॅनल'चे निर्विवाद वर्चस्व : अनिता भालेराव यांची बिनविरोध निवड

चिनावल ता. रावेर(सुवर्ण दिप वृत्तसेवा) : रावेर तालुक्यातील चिनावल ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक २ मधील रिक्त जागेसाठी झालेल्या सार्वत्रिक पोटनिवडणुकीत काँग्रेस प्रणित  'ग्रामविकास पॅनल'ने आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. प्रभाग क्रमांक २ मधून  'नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री' या आरक्षणातून श्रीमती अनिता नरेंद्र भालेराव यांची बिनविरोध निवड झाली आहे.

(ads)

आज दिनांक २९ एप्रिल २०२६ रोजी या निवडणुकीचा निकाल रावेर तहसील कार्यालयात जाहीर झाला. निवडून आलेल्या अनिता भालेराव या काँग्रेस प्रणित 'ग्रामविकास पॅनल'च्या उमेदवार आहेत. चिनावल गावाच्या लोकनियुक्त सरपंच सौ. ज्योती संजय भालेराव यादेखील याच पॅनलच्या असून, आजच्या या विजयामुळे ग्रामपंचायतीवर ग्रामविकास पॅनलचे वर्चस्व अधिक मजबूत झाले आहे.

(ads)

या यशासाठी मार्गदर्शक श्री. चंद्रकांत भंगाळे, हयात खान वाहेद खान, शेख निसार शेठ, शेख जाबीर शेख अमान , नरेंद्र उर्फ बापू पाटील,किशोर बोरोले, शेषराज भालेराव (ग्रामपंचायत सदस्य)दामोदर महाजन आणि नितीन भालेराव यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या निवडीबद्दल नवनिर्वाचित सदस्या अनिता भालेराव आणि काँग्रेस प्रणित ग्रामविकास पॅनलचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!