रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल कला आणि विज्ञान महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता हमी व ज्ञानस्त्रोत केंद्राच्या संयुक्त विद्यमानाने बौद्धिक संपदा हक्क विषयावर कार्यशाळा संपन्न झाली. कार्यशाळेचे प्रास्ताविक डॉ. एस. एन. वैष्णव, आय क्यु ए सी समन्वयक यांनी केले. त्यात त्यांनी बौद्धिक संपदा हक्क याचे सद्यस्थितीतील महत्व तसेच त्याची व्याप्ती या विषयी माहिती दिली.
(ads)
कार्यशाळेचे मुख्य वक्ते म्हणून महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विषयाचे प्रा. डॉ. सतीश ए. पाटील होते, त्यांचा परिचय प्रा. डॉ. जयंत पी. नेहेते यांनी करून दिला.
आपल्या व्याखानात प्रा. डॉ. सतीश ए. पाटील यांनी सर्वप्रथम सादरीकरणाच्या पहिल्या सत्रात बौद्धिक संपदे विषयी सर्वसाधारण माहिती दिली. दुसऱ्या सत्रात त्यांनी बौद्धिक संपदा आणि प्रत्यक्षात भारत सरकारच्या आयपीआर च्या पोर्टल वर आपले आयपीआर कसे नोंदणी करावी या बद्दल प्रात्यक्षिक द्वारे सादरीकरण केले. आयपीआर दाखल करतानाची संपूर्ण प्रक्रिया लागणारे सर्व दस्तऐवज या विषयी माहिती दिली.
(ads)
कार्यशाळेचे समारोपात प्राचार्य डॉ जे. बी अंजने यांनी बौद्धिक संपदा हक्क या विषयाच्या कार्यशाळा आयोजनाबद्दल चे महत्व सांगितले तसेच या संबंधी असलेल्या शिखर संस्था व त्यांचा बौद्धिक संपदा हक्क या बद्दल असलेले कार्य या बद्दल विवेचन केले तसेच संशोधकांनी त्यांचे संशोधन कार्यकरून ते बौद्धिक संपदा हक्क प्राप्त करून घेण्याच्या दृष्टीने वाटचाल करावी असे प्रतिपादन केले.
(ads)
उपस्थितांचे आभार प्रा डॉ. एस. एस. साळुंके यांनी मानले.कार्यशाळेत मोठ्या संख्येने शिक्षक व विद्यार्थी सहभागी झाले. यशस्वितेसाठी प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने, सचिव डॉ. एस. एन. वैष्णव, डॉ. एस. एस. साळुंके, प्रा. एच. एम. बाविस्कर, डॉ. जे. पी. नेहेते डॉ.एस. एस. साळुंके, श्रेयस पाटील, हर्षल पाटील आदिंनी प्रयत्न केले.


