रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा)
शहरासह तालुक्यातील सर्व सेतू केंद्र आणि महा-ई-सेवा केंद्रांमध्ये आज दिवसभर शासकीय पोर्टल सेवा बंद असल्याने नागरिकांच्या विविध कामांमध्ये मोठी अडचण निर्माण झाली.
(ads)
जातीचा दाखला, रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, नॉनक्रिमेलियर, केंद्रचा जातीचा दाखला यांसारख्या अत्यावश्यक कामांसाठी सकाळपासूनच नागरिक केंद्रांवर गर्दी करत होते. मात्र सर्व्हर डाऊन आणि पोर्टल लॉगिन न झाल्यामुळे एकही अर्ज स्वीकारता आला नाही.
(ads)
दिवसभर वाट पाहून शेवटी हताश होऊन अनेक नागरिकांना माघारी परतावे लागले. विशेषतः शेतकरी, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा सर्वाधिक फटका बसला. पेन्शन, शिष्यवृत्ती आणि शेतकऱ्यांच्या योजनांसाठीचे अर्ज सादर न झाल्याने त्यांचे काम खोळंबले आहे.
(ads)
दिवसभरात शेकडो नागरिकांची गैरसोय झाली असून प्रशासनाने तातडीने पोर्टल सेवा पूर्ववत करावी आणि बंद काळात नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी रावेर तालुक्यातील नागरिकांकडून होत आहे.
*प्रतिक्रिया*
पोर्टलचा तांत्रिक बिघाड हा राज्यस्तरावरून असल्याने स्थानिक पातळीवर काहीही करता येत नाही.
नकुल बारी, महा-ई-सेवा केंद्र चालक रावेर
*प्रतिक्रिया*
"सकाळी 9 वाजेपासून इथे आलो आहे. तीनदा फेरी मारली पण पोर्टल सुरूच होत नाही. आता पुन्हा उद्या यावं लागेल,"
एक नागरिक


