रावेर तालुक्यातील अवैधरीत्या रेतीचे उत्खनन : महसूल प्रशासनाचा कानाडोळा : अवैधरीत्या रेतीचे उत्खनन बंद करण्याची रावेर तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


रावेर  (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : रावेर तालुक्यातील खिरवड येथे रात्रंदिवस अवैधरीत्या रेती , माती ,गाळाच्या नावाखाली माती वाहतूक करीत असतात . व त्याला खिरवड सजेचे तलाठी व तसेच खानापूर भागाचे मंडळ अधिकारी तहसील कार्यालयातील काही कर्मचारी त्यांना हस्ते पर हस्ते सहकार्य करीत असतात. त्याचप्रमाणे पोलीस प्रशासन यांचा सुद्धा आशीर्वाद आहे. त्यामुळे अवैधरीत्या गौण खनिज वाहतूक करणारे म्हणजे रेती माफिया माती माफिया यांची हिंमत वाढलेली आहे. 

(ads)

तसेच गावातील स्थानिक राजकारणात ढवळाढवळ करून जातीय वाद निर्माण करीत असून गावातील शांतता व सुव्यवस्था बिघडवीत आहे , त्यांच्या विरोधात आवाज उठवण्यास कोणी गेले असता दारुड्या लोकांना दारू पाजून शिवीगाळ करण्यास भाग पाडत असतात .त्यामुळे त्यांची हिंमत व ताकत ही फार मोठ्याप्रमाणात वाढलेली आहे,गौण खनिज वाहतुकी करीता ३ जे.सी.बी मशीन अपुरे पडतात चौथे जे.सी.बी मशीन नजिकच्या गावातून भाड्याने आणले जाते. यावरून असे सिद्ध होते की, दर दिवसाला हजारो ब्रास रेती, मातीचे उत्खनन होत आहे. त्यामुळे शासनाची रॉयलटी बुडवून  गावाचा विकास खंडित होत आहे. अशा आशयाचे निवेदन राजकुमार खिरवडकर आणि नितीन गवई यांनी रावेर तहसीलदार यांच्याकडे निवेदन सादर केले आहे.

(ads)

               सदरचे वाहतुकी करीता असलेले ट्रक्टर ड्रायव्हर काही अल्पवयीन आहेत ,काहींकडे वाहन चालवण्याचा परवाना देखील नाही काहींकडे ट्रक्टर चे परवाने नसून काही ड्रायव्हर हे मोठ्याप्रमाणात मद्यपान करून कोणी मरेल का वाचेल याचे भान न ठेवता भरधाव वेगाने ट्रक्टर चालवत असतात. 

 (ads)

            सदर वरीष्टांकडे तक्रार केली असता गावामध्ये धरपकड करण्याकरिता कोणी अधिकारी येत असेल तर ते अधिकारी त्यांना फोन करून सांगतात त्यामुळे ते अवैधरीत्या उत्खनन भर रस्त्यात उभरून कोणाचा अपघात होईल यांचे भान न ठेवता तेथून पलायन करतात. असा आरोप राजकुमार खिरवडकर आणि नितीन गवई यांनी केला आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!