ऐनपूर: ऐनपूर परीसर शिक्षण प्रसारक मंडळाच्या सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी करण्यात आली.कार्यंक्रमाचे प्रमुख व्यक्ते महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जे बी अंजने यांनी ज्योतिबा फुले यांच्या विषयी सविस्तर माहिती दिली.
महात्मा फुले यांनी १८४८ साली पुण्यातील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा काढून सावित्रीबाई फुलें वर मुख्याध्यापक पदाची धुरा सोपवली. महात्मा फुलेंनी देशात मुलींसाठी पहिली शाळा काढून मुलींच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली..१८५२ साली त्यांनी अस्पृश्यांसाठी शाळा स्थापन केली. सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून त्यांनी समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत शिक्षण पोहोचविण्याचे काम केले.असे प्रतिपादन त्यांनी केले.यावेळी श्री व्हि एस नाईक महाविद्यालयातील प्रा डॉ सुर्यवंशी, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा हेमंत बाविस्कर, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ विनोद रामटेके, प्रा डॉ एस ए पाटील, प्रा व्ही एच पाटील , प्रा उमरीवाड,गोपाल पाटील, नितीन महाजन, हर्षल पाटील, सहदेव पाटील, उपस्थित होते. सुत्रसंचलन प्रा एच एम बाविस्कर यांनी केले आभार प्रा डॉ विनोद रामटेके यांनी मानले



