रावेर येथे महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त भव्य दिव्य मोफत बॉडी चेकअप

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

  रावेर येथे महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त भव्य दिव्य मोफत बॉडी चेकअप



 डॉक्टर दीपक सर यांनी केले निरोगी जीवनशैली बद्दल मार्गदर्शन 

रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) 

रावेर येथे फुले शाहू आंबेडकर सार्वजनिक वाचनालयामध्ये महात्मा ज्योतिराव फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त भव्य दिव्य मोफत बॉडी चेकअप चे आयोजन केले होते. सर्वप्रथम क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप पूजा करून त्यांना अभिवादन करण्यात आले. 

  (ads)

  यावेळी जागतिक आरोग्य सल्लागार दीपक सर, आरोग्य सल्लागार पंकज सर,आरोग्य सल्लागार बी सी साळुंके सर, माजी नगराध्यक्ष तथा भाजप जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर भाऊ महाजन, माजी नगराध्यक्ष हरिश शेठ गणवाणी, कामगार नेते दिलीप जी कांबळे, वंचित बहुजन आघाडीचे माजी तालुका अध्यक्ष बाळू शिरतुरे,शिवसेनेचे अशोक शिंदे, काँग्रेसचे संतोष महाजन, प्राध्यापक सी एस पाटील सर, शिरसाट साहेब, सचिन बागुल, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रघुनाथ जी कोंघे,रमेश तायडे,सदाशिव निकम, जितेंद्र ढेरे, अरुण भालेराव, विनोद तायडे,संसारे गुरुजी, रायमले साहेब, विकी साबळे, पिंटू भाऊ महाजन, पत्रकार कृष्णा पाटील, पत्रकार दिलीप वैद्य सर, पत्रकार सुनील चौधरी, पत्रकार नझुद्दिन शेख, पत्रकार शालिक महाजन, पत्रकार राहुल डी गाढे, पत्रकार विलास सावकारे, यांच्यासह मोठ्या संख्येने लाभार्थी उपस्थित होते.

      (ads)

मिशन फिट इंडिया अंतर्गत प्रथमच रावेर शहरांमध्ये महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब डॉक्टर दीपक सर,आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त भव्य दिव्य मोफत बॉडी चेकअप व निरोगी जीवनशैली बद्दल डॉक्टर दीपक सर यांनी पुढे म्हटले वाढलेलं वजन पित्त ऍसिडिटी पोटाचे आजार मणक्याचे आजार व स्किन प्रॉब्लेम हे त्रास तुम्हाला असतील तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी मोफत मार्गदर्शन डॉ. दीपक सर जागतिक आरोग्य सल्लागार मिशन फिट इंडिया, पंकज सर जागतिक आरोग्य सल्लागार मिशन फिट इंडिया या कॅम्प मध्ये ७२ लोकांचे बॉडी चेकअप करून त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

  (ads)

 आलेल्या सर्व पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. सदर कार्यक्रम यशस्वी साठी सुपरवायझर राजेंद्र अटकळे सर, सुपरवायझर संतोष कोसोदे सर, संघरत्न दामोदरे सर, महेंद्र लोंढे सर, सृष्टी कोसोदे, भरतभूषण पाटीलसर व जितेंद्र साबळे यांनी परिश्रम घेतले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!