रावेर येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची २०० वी जयंती उत्साहात साजरी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 



रावेर येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची २०० वी जयंती रविवारी उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त येथील महालक्ष्मी मंदिरात पूजन करून महात्मा फुले यांच्या प्रतिमेची सवाद्य शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेवर ठीक ठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली.

(ads)

येथील महालक्ष्मी मंदिरापासून महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेची सवाद्य शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी वेदांत संतोष पाटील (महात्मा फुले) व स्वरा रवींद्र महाजन (सावित्रीबाई) यांना वेशभूषा करून रथात त्यांची मिरवणूक करण्यात आली. भजनी मंडळ, ढोल ताशांच्या गजरात ठिकठिकाणी शोभायात्रेवर पुष्पवृष्टी करण्यात आली

(ads)

डॉ. हेडगेवार चौक, पाराचा गणपती मंदिर, लाल बहादूर शास्त्री चौक, कारागीर नगर, राजे छत्रपती शिवाजी महाराज चौक, स्वामी विवेकानंद चौक, मरी माता मंदिर मार्गे शोभायात्रा काढण्यात आली. महात्मा फुले चौकात समारोप झाला. शोभायात्रेत मोठ्या संख्येने युवक कार्यकर्त्यांसह स्त्री-पुरुष सहभागी झाले होते.

पाहूया याबाबतचा वृत्तांत



#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!