चिनावल येथील तलाठी कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


विविध मान्यवरांकडून अभिवादन आणि मिरवणुकीने गावात उत्साहपूर्ण वातावरण

चिनावल ता. रावेर – रावेर तालुक्यातील चिनावल येथील तलाठी कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. तलाठी कार्यालयात सकाळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर प्रथम दीप प्रज्वलन करून नंतर पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

(ads)

यावेळी गावचे पोलीस पाटील निलेश नेमाडे,युवराज बाळू भालेराव, गोपाळ नेमाडे.,ठकसेन पाटील,सागर भारंबे,जयेश इंगळे,नजिर मेंबर,गौतम ठाकरे,परेश महाजन,पत्रकार गिरीश नारखेडे तसेच कोतवाल फिरोज तडवी यांनी उपस्थित राहून बाबासाहेबांना अभिवादन केले.युवराज भालेराव यांनी बाबासाहेबांच्या कार्याबद्दल आपले विचार मांडले आणि आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी चिनावल चे ग्रामस्थ हजर होते.

(ads)

संध्याकाळी बाबासाहेबांच्या प्रतिमेची गावातील प्रमुख मार्गावरून भव्य मिरवणूक काढण्यात आली.यावेळी बाबासाहेबांच्या विचारांचा प्रबोधन पर देखावा मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण ठरला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय भालेराव तसेच सरपंच ज्योती संजय भालेराव व समस्त गावकरी उपस्थित होते. बाबासाहेबांच्या गाण्यांनी संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!