निंभोरा बुद्रुक येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती उत्साहात साजरी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


भुसावळ तालुक्यातील निंभोरा बुद्रुक येथे क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि भारतीय संघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी यांची संयुक्त जयंती मोठ्या उत्साहात जल्लोषपूर्ण वातावरणात आणि अभिमानाने साजरी करण्यात आली होती .संपूर्ण गावात सकाळपासून जयंतीचा नागरिका मध्ये मोठा उत्सव दिसून आला .सकाळी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर सामुदायिक वंदना घेण्यात आली. 

 (ads)

   त्यानंतर सार्वजनिक संयुक्त जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष प्रकाश सरदार, एन . टी . इंगळे,दुर्गेश कोलते , ग्राम पंचायत सदस्य उल्हास बोरोले व यासीन पठाण , सन्नी चाहेल, दिलीप बऱ्हाटे,नॅशनल व्हॉइस मिडीया चे जिल्हाध्यक्ष दिनेश इखारे, जिल्हा सचिव रमेश खंडारे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमासाठी समितीचे मनीष सुरवाडे ,राहुल वाघ ,तरुण गवई, निखिल मेश्राम ,अजय वाघ, अरुण भालेराव,गौरव नरवाडे ,निखिल नरवाडे ,सुमित चतुर, चिकू मेश्राम, सूरज पवार, साहिल साळवे, शुभम खंडारे, कुणाल इंगळे, अनिकेत मोरे यांनी परिश्रम घेतले आहे.

(ads)

तसेच विश्वरत्न महिला मंडळ या सर्वांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले. भारतीय बौद्ध महासभा सभेच्या नव्याने नियुक्त केलेल्या अध्यक्ष उषा सुरवाडे यांचे स्वागत करण्यात आले.मान्यवरांच्या हस्ते समता सैनिक दल च्या प्रशिक्षण शिबिरात सहभागी झालेल्या महिलाना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.संध्याकाळी संपूर्ण गावामध्ये मोठ्या थाटामाटात वाजंत्रीसह मिरवणूक काढण्यात आली आणि जय भिम च्या घोषणांनी संपूर्ण निंबोरा बुद्रुक दनानुन गेले होते .या उत्सवात सामाजिक कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील लोक प्रतिनिधी व गावकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!