ऐनपूर : ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला आणि विज्ञान महाविद्यालयात भारतरत्न, राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती साजरी करण्यात आली . प्रा डॉ एस बी पाटील यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले. प्रा. व्ही एच पाटील,गोपाळ पाटील, महेंद्र महाजन नितीन महाजन, सुनील पाटील , हर्षल पाटील ,श्रेयस पाटील, अनिकेत पाटील यांनी प्रतिमा पूजन करून अभिवादन केले. यावेळी प्रा डॉ एस बी पाटील व प्रा व्ही एच पाटील यांनी उपस्थितांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी सविस्तर माहिती दिली.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे बी अंजने यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन झाले.





