रावेर येथील पोदार लर्न स्कूल येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती उत्साहात साजरी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त पोदार लर्न स्कूल रावेर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून महामानवाला अभिवादन करण्यात आले. यावेळी पोदार लर्न स्कूलचे अध्यक्ष डॉ. गुलाबराव पाटील सर, प्रिंसिपल जतीन हिंदुजा सर, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. स्कूल चे प्रिंसिपल जतीन हिंदुजा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर  यांनी किती कठीण परिस्थितीत आपलं शिक्षण पूर्ण केले याच महत्व पटवून विद्यार्थ्यांना सांगितलं. या निमित्ताने आयोजित वक्तृत्व स्पर्धेत संविधान तायडे, संस्कार राऊत या विद्यार्थ्यांनी भाषण दिले.   

हा कार्यक्रम उत्साहात व यशस्वीरीत्या पार पडला.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!