रावेर तालुक्यातील सांगवे येथे महात्मा फुले जयंती व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे



 रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : रावेर तालुक्यातील सांगवे येथे महात्मा जोतिबा फुले यांची 200 वी (द्विशताब्दी) व विश्वरत्न, महामानव, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी संयुक्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सर्व प्रथम महात्मा जोतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस विटवे /सांगवे गृप ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच मुकेश चौधरी यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.

(ads)

 उप सरपंच ईश्वर चौधरी, ग्रा. पं. सदस्य साहेबराव वानखेडे, गणेश मनुरे,मधुकर पाटील, विमलताई भिल्ल यांचे हस्ते धूप पूजा पुष्प अर्पण करून उपस्थित समाज बांधवांना आयु. सीताराम वानखेडे यांनी त्रिसरण पंचशील दिले. या प्रसंगी ग्रा.पं. सदस्य साहेबराव वानखेडे यांनी मनोगत व्यक्त करतांना म्हटले की महापुरुषांची जयंती उत्सव साजरा करत असतांना महापुरुषांचे विचार आचरणात आणणे फार महत्वाचे आहे कारण बाबासाहेब म्हणाले होते की, माझ्या नावाचा जय जयकार करण्या पेक्षा माझे राहिलेले अपूर्ण कार्य पूर्ण करा म्हणजेच बाबासाहेबाना अभिप्रेत असलेला प्रबुद्ध भारत निर्माण करायचा असेल तर महापुरुषांच्या जिवन चरित्र्यावर आधारीत पुस्तके वाचली पाहिजे अशा आशयाचे मनोगत व्यक्त केले.

(ads)

 या नंतर उपस्थित विद्यार्थी यांना, जग बदलणारा बाप माणूस, गुलामगिरी, विद्यार्थी जागृत व्हा, असे पुस्तके वाटप करण्यात आले या प्रसंगी रमेश तायडे,सुरेश तायडे,सांगवे पोलीस पाटील वैशाली कोळी, माजी सरपंच सकूबाई भिल्ल,आशा सेविका वैशाली कोळी,गणेश तायडे, मनोहर तायडे,लीलाबाई तायडे,नंदाबाई तायडे सुधाकार तायडे, विनायक तायडे, प्रेम तायडे,उमेश तायडे करण तायडे, शुभम तायडे व जयंती उत्सव समिती सदस्य व गावातील गावकरी, महिला, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!