रावेर तालुक्यातील निरुळ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य मोफत आरोग्य शिबिर

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे
रावेर तालुक्यातील निरुळ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य मोफत आरोग्य शिबिर


रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रावेर तालुक्यातील निरुळ येथे भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपत आरोग्य सेवेचा अनोखा संदेश देण्यात आला.

(ads)

या शिबिराचे आयोजन प्रदीप दिनकर खैरे यांनी केले होते. बाबासाहेबांना मानवंदना म्हणून त्यांनी CBC, मधुमेह व थायरॉईड तपासणी मोफत उपलब्ध करून देत समाजासाठी प्रेरणादायी कार्य केले. ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्य समस्या लक्षात घेता अशा उपक्रमांची नितांत गरज असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. “लोकांची सेवा हीच खरी भीम जयंती” असा अर्थपूर्ण संदेशही त्यांनी दिला.

(ads)

कार्यक्रमाचे उद्घाटन प्राथमिक आरोग्य केंद्र, वाघोड येथील आरोग्य सहाय्यक श्री. चंपालाल महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

(ads)

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी टेक्निशियन वैभव गाढे, अमोल सिंग आणि गजानन मशाने यांनी मोलाचे योगदान दिले. तसेच गावातील ग्रामपंचायत सदस्य व मान्यवर राजू भाऊ सवर्णे, दिलीपजी कांबळे, उमेश गाढे, महेश तायडे, रवींद्र रायपूरे, सुरेश अटकाळे, राहुल निंभोरे, राजेश अटकाळे यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.या आरोग्य शिबिराला गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!