डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त जामनेरमध्ये भव्य सामाजिक उपक्रम; रुबी हॉस्पिटलमध्ये रुग्णांना फळवाटप करून दिला मानवतेचा संदेश

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


जळगाव जिल्हा प्रतिनिधी (नितीन इंगळे) 

जामनेर : संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त जामनेर शहरात विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. या निमित्ताने रुबी हॉस्पिटलमध्ये रुग्णांना फळवाटपाचा विशेष कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

(ads)

या उपक्रमाचे आयोजन राजकुमार सपकाळे, संदीप सुरवाडे आणि मुंबई येथील किरण भाऊ जोहरे यांच्या वतीने करण्यात आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांतील समता, बंधुता आणि मानवतेचा संदेश प्रत्यक्ष कृतीत उतरवत रुग्णसेवेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्यात आली.

(ads)

कार्यक्रमादरम्यान रुग्णालयातील सर्व रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. अचानक झालेल्या या उपक्रमामुळे रुग्णांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. उपस्थित मान्यवरांनीही रुग्णांशी संवाद साधत त्यांना धीर दिला व लवकर बरे होण्याच्या शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमास राजकीय, सामाजिक व स्थानिक स्तरावरील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.

(ads)

भाजपचे वरिष्ठ नेते जितेंद्र भाऊ पाटील, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बावस्कर, नगरसेवक सुभाष पवार, प्रल्हाद सोनवणे, नगरसेवक मुकुंदा सुरवाडे,गोलू झाल्टे, माजी नगरसेवक कैलास नरवाडे, जयंती अध्यक्ष विनोद सुरवाडे, नगरसेवक दत्तू जोहरे, शक्तीवर्धन सुरवाडे, सचिन भाऊ थोरात, दीपक माळी, राहुल पाटील तसेच रुबी हॉस्पिटलचे चव्हाण सर यांची विशेष उपस्थिती होती.

(ads)

मान्यवरांनी आपल्या मनोगतातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक समतेच्या विचारांचा गौरव करत, अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते असे मत व्यक्त केले. तसेच गरजू व रुग्णांसाठी राबवले जाणारे असे उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी असल्याचेही सांगितले.

(ads)

या उपक्रमामुळे संपूर्ण रुग्णालय परिसरात सामाजिक एकोपा आणि जयंतीचा उत्साह यांचा सुंदर संगम पाहायला मिळाला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राबविण्यात आलेला हा उपक्रम केवळ फळवाटपापुरता मर्यादित न राहता, मानवतेचा आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारा ठरला

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!