सरस्वती इंग्लिश मेडियम स्कुल, विवरे खुर्द येथे विद्यार्थ्यांचा गुण-गौरव सोहळा उत्साहात संपन्न

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


सरस्वती शैक्षणिक आणि सांस्कृतिक विकास मंडळ, विवरे संचलित सरस्वती इंग्लिश मेडियम स्कुल, विवरे खुर्द येथे विद्यार्थ्यांचा गुण-गौरव सोहळा मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून केंद्र प्रमुख श्री दिपक सोनार सर उपस्थित होते. तसेच शाळेचे प्रशासक श्री. महेंद्र दयाराम पाटील सर, सहप्रशासक सौ. संगीता महेंद्र पाटील मॅडम,मुख्याध्यापिका सौ. मनिषा संजय पाटील मॅडम आणि पर्यवेक्षक 

श्री. डिगंबर चौधरी सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

(ads)

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते श्री गणेश पूजन, सरस्वती पूजन आणि दीपप्रज्वलन करून करण्यात आली. त्यानंतर 2025-2026 या शैक्षणिक वर्षात नर्सरी ते इयत्ता दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये बसवंत स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रंगोत्सव, दिवाळी स्पर्धा, ऑलिम्पियाड तसेच वार्षिक क्रीडा स्पर्धांतउत्साहाने सहभाग नोंदवून उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा पदक, ट्रॉफी, प्रमाणपत्रे व इतर बक्षिसे देऊन गौरव करण्यात आला.

(ads)

यावेळी शाळेचे प्रशासक, मुख्याध्यापिका तसेच शिक्षकवृंद यांचाही विशेष सन्मान प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन करण्यात आला. प्रमुख अतिथी दिपक सोनार सर यांनी आपल्या मनोगतातून गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि शाळेच्या प्रगतीसाठीही अभिनंदन व्यक्त केले.

(ads)

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन इयत्ता दहावी व नववीच्या विद्यार्थिनींनी अत्यंत सुंदरपणे पार पाडले. या यशस्वी सोहळ्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

संपूर्ण कार्यक्रम आनंददायी आणि प्रेरणादायी वातावरणात पार

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!