करिश्मा नायर असणार जळगांव जिल्हा परिषदेच्या नव्या सीईओ : प्रशासकीय कामाचा दांडगा अनुभव; लवकरच पदभार स्वीकारणार
जळगाव (राहुल डी गाढे) : जळगांव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांची मुंबईतील पोकरा प्रकल्पांच्या संचालकपदी बदली झाली असून त्याच्या जागेवर नव्याने नाशिकच्या अतिरिक्त महापालिका आयुक्त करिश्मा नायर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
(ads)
मीनल करणवाल यांनी आपल्या कार्यकाळात जळगाव जिल्ह्यात ठोस आणि परिणामकारक कामगिरी केली. तसेच ग्रामीण भागातील आरोग्य शिक्षण बळकट करणे, शिक्षणाच्या सुविधा सुधारणा तसेच पाणीपुरवठा व ग्राम विकासाशी अशी संबंधित कामांना त्यांनी विशेषता: प्राधान्य दिले. यासह अनेक योजना प्रभावीपणे राबविण्यात आल्या.
(ads)
तर नव्याने आलेल्या जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर या सन 2021 बॅचच्या तुकडीतील आयएएस अधिकारी आहेत. सध्या त्या नाशिक महापालिका अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. तेथील 2 एप्रिल 2025 मध्ये पदभार स्वीकारला होता.
(ads)
हेही वाचा : अल्पवयीन मुलीस फुस लावुन पळवुन नेणाऱ्यास रावेर गुन्हे शोध पथकाने ठोकल्या बेडया
अनेक ठिकाणी त्यांनी आपल्या कामाची वेगळी छाप पाडली आहे. प्रशासकीय कामाचा दांडगा अनुभव असलेल्या महिला आयएएस अधिकारी करिश्मा नायर यांना प्रशासकीय खात्यात ओळखले जाते.



