अल्पवयीन मुलीस फुस लावुन पळवुन नेणाऱ्यास रावेर गुन्हे शोध पथकाने ठोकल्या बेडया

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : दि. २८/०३/२०२६ रोजी सकाळी ११.०० वाजेच्या सुमारास १५ वर्ष वय असलेल्या अल्पवयीन गुलिस गावातीलच एक इसम खिरोदा ता. रावेर येथुन फुस लावुन पळवुन घेवुन गेला असल्याची तक्रार रावेर पोलिस स्टेशन ला प्राप्त झाले वरुन रावेर पोलिस स्टेशन ला १३२/२०२६ भा. न्या. संहीता कलम १.३७ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

(ads)

सदर गुन्हयात रावेर पोलिस स्टेशनचे पोनि डॉ. विशाल जयस्वाल यांनी लागलीच रावेर गुन्हे शोध पथकाला सुचन्या दिल्यावरुन आरोपीता बाबत गोपनिय माहीती काढण्यात आली तसेच आरोपीताच्या जाण्याचा मार्गाच सीसीटीव्ही फुटेज चेक करण्यात आले परंतु गुन्हास उपयुक्त अशी कोणतीही माहीती मिळत नव्हती अखेर रावेर गुन्हे शोध पथकाने आरोपीताची तांत्रिक माहीतीवरुन सध्याचा ठाव ठिकाणा शोधुन काढला परंतु तो तेथुन काही काळ अगोदरव निघुन गेला असल्याचे कळाले परंतु अखेर १९ तासांच्या अथक परीश्रमानंतर आरोपी शुभम अनिल पाटील रा. खिरोदा ता. रावेर यास भिकनगांव जि. खरगोन मध्य प्रदेश येथून अटक करण्यात आलेली आहे. आरोपीतास पिडीते विषयी विचारपुस केली असता त्याने पिडीतेस तेथेच बाजुच्या एका खोलित ठेवल्यावे कबुल केल्याने पिडीतेस सुखरुप पणे रावेर पोलिस स्टेशन येथे आणण्यात आले आहे.

(ads)

सदर कार्यवाही ही मा. श्री. महेश्वर रेड्डी पोलिस अधिक्षक सो, मा. श्री. अशोक नखाते अप्पर पो. अधिक्षक सो. मा. श्री अनिल बडगुजर पोलिस उपअधिक्षक सो फैजपुर भाग यांच्या मार्गदर्शनाने पो.नि.डॉ विशाल जयस्वाल, पो.उप. निरीक्षक सुनिल मोरे, पो.हे.कों/समाधान ठाकुर गुन्हे शोध पथकातील, पोकों / श्रीकांत चव्हाण, प्रमोद पाटील, सुकेश तडवी, म.पो.कों/उषा मशाने यांनी केला असुन गुन्हयाचा पुढील तपास पो.उप. निरीक्षक मनोज महाजन हे करीत आहेत.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!