परिस्थिती कितीही हलाखीची असली तरीही मनात जिद्द आणि कष्टाची तयारी असेल तर कोणतेही ध्येय अशक्य नाही, हेच अजनाड येथील एका सामान्य कुटुंबातील तरुणाने सिद्ध केले आहे. अजनाड गावातील रणजित युवराज कोचूरे या युवकाने आपल्या अफाट परिश्रमाच्या जोरावर पहिल्याच प्रयत्नात मीरा भाईंदर(Mumbai Police) आणि राज्य राखीव पोलीस बल (SRPF) या दोन्ही दलांमध्ये निवड होऊन गावाचे नाव उज्ज्वल केले आहे.
(ads)
रणजितची कौटुंबिक पार्श्वभूमी अत्यंत गरिबीची आहे. त्याचे आई आणि वडील दोघेही रोजंदारीवर मोलमजुरी करून घराचा गाडा चालवतात. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत त्यांनी रणजितला शिकवले. आई-वडिलांचे हे कष्ट डोळ्यांसमोर ठेवून रणजितने पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न पाहिले आणि पहिल्याच प्रयत्नात ते प्रत्यक्षात आणले. त्याच्या या दुहेरी यशामुळे आई-वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.
(ads)
रणजितने आपल्या मैदानी आणि लेखी परीक्षेच्या तयारीसाठी 'योद्धा अकॅडमी'चे मार्गदर्शन घेतले. अकॅडमीतील मार्गदर्शकांनी दिलेल्या अचूक टिप्स, कठोर सराव आणि रणजितची स्वतःची सातत्यपूर्ण मेहनत यामुळे त्याला हे घवघवीत यश संपादन करता आले. कोणतीही मोठी कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना केवळ मार्गदर्शनाचा योग्य वापर आणि स्वतःची जिद्द याच्या बळावर त्याने हा टप्पा गाठला.
(ads)
अजनाड गावात ही यशाची बातमी धडकताच संपूर्ण गावातून पहिला पोलिस झाल्या मुळे गावात आनंदीमय वातावरणात गावात भव्य मिरवणूक काढून त्याचा सत्कार करण्यात आला एक मोलमजुरी करण्याचा मुलगा खाकी वर्दीचा मानकरी झाल्याने ग्रामस्थांसाठी अभिमानास्पद बाबा आहे .
(ads)
माझ्या आई वडिलांनी केलेल्या कष्टाचे हे फळ आहे.माझ्या मोठे बंधु चे मार्गदर्शन तसेच त्यांनी माझ्या व परिवार साठी घेतलेल्या कष्टाचे हे फळ असून माझ्या यशाचे सर्व श्रेय माझे आई वडील मोठे बंधु यांना देतो.
अश्या भावना रणजीत कोचुरे यांनी व्यक्त केल्या.


