सरस्वती इंग्लिश मेडियम स्कूल विवरे खुर्द चा दहावीच्या निकालात रावेर तालुक्यात डंका

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


१० वीच्या निकालात तालुक्यात प्रथम व तृतीय क्रमांक पटकावत १००% निकालाची परंपरा कायम राखत गुणवत्तेची पुन्हा सुवर्णमुद्रा


     विवरे खुर्द येथील सरस्वती शैक्षणिक आणि सांस्कृतिक विकास मंडळ संचलित सरस्वती इंग्लिश मेडियम स्कूल ने फेब्रुवारी २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (SSC) परीक्षेत दैदिप्यमान यश संपादन करत रावेर तालुक्यात शिक्षण क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे. विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

    (ads)

   शाळेची गुणवंत विद्यार्थिनी कुमारी अनुष्का प्रमोद पाटील हिने ९५.२० टक्के गुण मिळवत रावेर तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. तसेच कुमारी खुशी भुषण लोखंडे हिने ९४ टक्के गुणांसह तालुक्यात तृतीय क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले. यासोबतच कुमारी लोकिता पंकज पिंपळे हिने ९२.८० टक्के गुण प्राप्त करत केंद्रात चतुर्थ क्रमांक मिळवून शाळेच्या यशात भर घातली.

   (ads)

   विशेष म्हणजे, सरस्वती इंग्लिश मेडियम स्कूलने यावर्षीही १०० टक्के निकालाची गौरवशाली परंपरा कायम राखत गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा आपला लौकिक अधिक दृढ केला आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामागे शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन, विद्यार्थ्यांची मेहनत, पालकांचे सहकार्य आणि शाळेचे उत्कृष्ट शैक्षणिक वातावरण महत्त्वाचे ठरले आहे.   या यशाबद्दल शाळेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापिका तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता, संस्कार आणि आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी शाळा सातत्याने प्रयत्नशील असून आधुनिक शिक्षणपद्धतीमुळे शाळेने तालुक्यात वेगळी ओळख निर्माण केली आहे.

 (ads)

     विद्यार्थ्यांच्या या नेत्रदीपक यशामुळे पालक व ग्रामस्थांकडून शाळेवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून *“गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी विश्वासाचे नाव” म्हणून सरस्वती इंग्लिश मेडियम स्कूलकडे पाहिले जात आहे.*

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!