रावेर ग्रामीण रुग्णालयात आ. अमोल जावळे यांच्या प्रयत्नाने नगराध्यक्षांच्या हस्ते डायलिसिस सेंटरचे उद्घाटन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


रावेर ग्रामीण रुग्णालयात आ. अमोल जावळे यांच्या प्रयत्नाने नगराध्यक्षांच्या हस्ते डायलिसिस सेंटरचे उद्घाटन

रावेर येथील ग्रामीण रुग्णालय मध्ये महाराष्ट्र दिनी डायलिसिस सेंटरचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले.  रावेर शहरात रुग्णांची गरज लक्षात आल्याने गोरगरीब जनतेला डायलिसिस करण्यासाठी जळगाव किंवा बुऱ्हानपूर जावे लागत होते व मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च करावा लागत होता परंतु डायलिसिस सेंटर रावेर येथेच झाल्यास जनतेची सोय होईल या उदात्त हेतूने आमदार अमोल जावळे यांनी रावेर ग्रामीण रुग्णालयात डायलिसिस सेंटर मंजुरीसाठी अथक प्रयत्न केले त्याला यश आल्याने महाराष्ट्र दिनी संपूर्ण महाराष्ट्रात या सेंटर चे ऑनलाईन लाईन लोकार्पण राज्याचे आरोग्य मंत्री ना प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आले. तरी मान्यवरांनी आपल्या भाषणातून आरोग्य मंत्री आणी आ अमोल जावळे यांचे आभार मानले.

 (ads)

ऑनलाइन उद्घाटन झाल्यानंतर स्थानिक कार्यक्रम पार पडला त्यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्षा संगीता महाजन नगरसेवक, राजेश शिंदे, सीमा जमादार, प्रमिला पाटील योगिता महाजन अर्चना पाटील, अमोल पाटील पद्माकर महाजन दिलीप पाटील तसेच भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सुरेश धनके,प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी तहसीलदार दीपा जेधे, अमित खरात नायब तहसीलदार संजय तायडे गटविकास अधिकारी विनोद मेढे, प्रमुख उपस्थित होते. पद्माकर महाजन यांनी मनोगत व्यक्त करतांना म्हटले की, आ अमोल जावळे यांच्या माध्यमातून लवकच उपजिल्हा रुग्णालयाचा विषय मार्गी लागेल 

(ads)

कार्यक्रमास आमदार अमोल जावळे यांची स्वीय सहाय्यक संदीप पाटील, योगेश साळुखे, अंबिका व्यायाम शाळेचे भास्कर महाजन, वासु नरवाडे, अरुण शिंदे, सी एस पाटील रवी पाटील ऍड सूर्यकांत देशमुख राहुल पाटील वाय व्ही पाटील संदीप सावळे पी के महाजन पवन चौधरी ,जगदीश घेटे पंकज वाघ चंद्रकांत वैदकर यांच्यासह भारतीय जनता पक्ष शिवसेना शिंदे गट पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्र संचलन दीपक नगरे यांनी केले तर प्रास्ताविक करून आभार वैद्यकीय अधीक्षक डॉ वैभव गिरी यांनी मानले. 

(ads)

 कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ स्वप्नील सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधीक्षक डॉ वैभव गिरी वै अ उमेश मुकुंद शारदा धुंदळे डायलिसिस सेंटर चे कर्मचारी तेजस गाढे सुलेमान शाह प्रकाश तायडे यांच्यासाह सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले या सेंटर ला एका वेळी पाच व्यक्तींचे डायसलीसिस करण्यात येईल असेही सांगण्यात येऊन या शासकीय सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन दीपा जेधे यांनी केले आहे

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!