महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत शिरपूर येथे जळगाव विद्यार्थी संघटनेतर्फे एक सामाजिक व स्तुत्य उपक्रम

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


१ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत शिरपूर येथील आर. सी. पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षाच्या जळगाव विद्यार्थी संघटनेतर्फे एक सामाजिक व स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.

या उपक्रमांतर्गत के. वा. पुसो एन. झेड. मराठे विध्यापीठ संस्था, थाळनेर संचलित अनाथ व मतिमंद मुला-मुलींच्या बालगृहात विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. वह्या, पेन, पुस्तके आदी साहित्य देऊन विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

(ads)

मा. उपनगराध्यक्षा सौ. संगीता ताई देवरे यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे उत्साहपूर्ण वातावरणात वाटप करण्यात आले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले तसेच आत्मविश्वासाने पुढे जाण्याचे मार्गदर्शन केले. या उपक्रमामुळे बालगृहातील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला.

(ads)

यावेळी संघटनेचे अध्यक्ष भगतसिंग नरवाडे यांनी ठामपणे सांगितले की, “हा उपक्रम केवळ एक दिवसापुरता मर्यादित नसून, समाजासाठी सातत्याने कार्य करत राहणे हा आमचा दृढ संकल्प आहे. जळगाव विद्यार्थी संघटनेचे असे सामाजिक उपक्रम यापुढेही अधिक जोमाने व व्यापक स्वरूपात सुरू राहतील.”

(ads)

या कार्यक्रमाला मा. उपनगराध्यक्षा सौ. संगीताताई देवरे, प्रभारी मुख्याध्यापक मा. निलेश पाटील सर तसेच शिक्षकवर्ग उपस्थित होते. त्यांच्या हस्ते साहित्याचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर जळगाव विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी - भगतसिंग नरवाडे ,दुर्गेश पाटील,देवेश राणे,धर्मेश पाटील,धनंजय चौधरी,हितेश पाटील,ओम पाटील,ओम महाजन,केतन महाजन,विवेक हिवाळकर,हर्षल पाटील,पुरुषोत्तम पाटील, मयूर महाजन, सौरव पाटिल, मयूर माळी ,संचित महाजन,रोहित धनगर,भावेश धनगर,गिरीश सोनार,दिव्येश तेली,दर्पण कोल्हे,तनमय पाटील,दुर्गेश जंगले ,तेजस मगरे,दिपक गुर्जर, वेद महाजन ,श्रीकांत चौधरी व शिरपुर संघटना -चिंतन राजपूत ,चिंतन गुर्जर, भावेश बोरसे,जय जाधव, ललित माळी, केतन पाटिल ,वैभव पाटिल , धीरज महाजन,कार्तिक बोरेसे उपस्थित होते.

(ads)

जळगाव विद्यार्थी संघटना सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबवत असून शिक्षण, आरोग्य व सामाजिक जागरूकता या क्षेत्रात कार्य करत आहे. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये समाजाप्रती कर्तव्यभावना निर्माण होण्यास मदत होत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!