रावेर (राहुल डी गाढे) : रावेर पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक 24/06/2026 रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे मौजे अहिरवाडी गावात पुरपस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी मौजू अहिरवाडी गावातील नाल्याकाठी राहणारे ग्रामस्थांचे घराचे नुकसान झाले असुन सदर ठिकाणी पोलीस निरिक्षक, संदीप पाटील साो, यांनी भेट देवुन परिस्थितीचा आढावा घेत ग्रामस्थांच्या समस्या जाणुन घेतल्या आहेत.
(ads)
त्यानंतर आज दिनांक 28/06/2026 रोजी मौजे अहीरवाडी येथे पोलीस निरिक्षक यांच्या संकल्पनेतुन पुरपरिस्थितीत बाधित झालेल्या सुमारे 140 ते 150 पुरग्रस्त ग्रामस्थांना रावेर पोलीस स्टेशनच्या वतीने जेवणाचे वाटप करण्यात आले. या सामाजिक उपक्रमात पोलीस उपनिरिक्षक तुषार पाटील, पोहवा/2982 सुनिल वंजारी व पोशि/1976 तथागत सपकाळे यांनी सक्रीय सहभाग घेतला.
(ads)
सदरचा सामाजिक उपक्रम हा जळगाव जिल्हा पोलीस अधिक्षक, मा. श्री. श्रीकांत धिवरे साो तसेच अप्पर पोलीस अधिक्षक मा.श्री. संदीप गावीत साो, यांच्या सामाजिक बांधलिकी जोपासणाऱ्या उपक्रमांच्या प्रेरणेतून तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी मा. श्री. अनिल बडगुजर साो यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर पोलीस स्टेशनचे नवनियुक्त पोलीस निरिक्षक मा. श्री. संदीप पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली राबविण्यात आली असुन पुरग्रस्त ग्रामस्थांनी रावेर पोलीसांच्या या मदतकार्याबद्दल समाधान व्यक्त करत आभार मानले.



