जळगाव जिल्हा प्रतिनिधी (नितीन इंगळे)
जळगाव जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. स्वप्नील सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली जामनेर तालुक्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम उत्साहात राबविण्यात आली. आरोग्य विभागाने ग्रामीण व शहरी भागात प्रभावी नियोजन करत एकाच दिवशी तालुक्यातील ३५ हजार २९६ बालकांना पोलिओची लस देत उल्लेखनीय कामगिरी केली.
(ads)
या मोहिमेचा शुभारंभ जामनेर उपजिल्हा रुग्णालयात जामनेर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा साधनाताई महाजन यांच्या हस्ते तीन वर्षीय अभिराम गुजर या बालकाला पोलिओचे दोन थेंब पाजून करण्यात आला.
(ads)
यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. हर्षल चांदा, डॉ. प्रशांत महाजन, डॉ. पल्लवी राऊत, डॉ. नरेश पाटील, निर्मला भालोद, लता साबळे, बशीर पिंजारी, सुरेखा गोसावी, अण्णा जाधव, गोपाल पाटील, सुधाकर माळी, राजू माळी, शंकर इंद्राळे, उमर गुल यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(ads)
या मोहिमेसाठी ग्रामीण भागात २१५ व शहरी भागात २४ अशा एकूण २३९ पोलिओ बूथची स्थापना करण्यात आली होती. तसेच वीटभट्ट्या, भटके, जिनिंग प्रेस, शेतातील रहिवासी, उतारकरी यांच्यासह पाच वर्षांपर्यंतच्या बालकांपर्यंत पोहोचण्यासाठी ८ मोबाईल पथके, तर बसस्थानक, बाजारपेठ व इतर वर्दळीच्या ठिकाणी लसीकरणासाठी ७ ट्रान्झिट पथकांची नियुक्ती करण्यात आली होती.मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, आशा स्वयंसेविका व आरोग्य कर्मचाऱ्यांसह एकूण ७२४ कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन नियुक्त करण्यात आले होते. तसेच संपूर्ण मोहिमेवर देखरेख ठेवण्यासाठी ४८ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती.
(ads)
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे यांनी सांगितले की, मोहिमेच्या दिवशी लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांसाठी एक दिवसाच्या खंडानंतर पुढील तीन दिवस घरोघरी जाऊन पोलिओ लसीकरण करण्यात येणार आहे.राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व वैद्यकीय अधिकारी, गटप्रवर्तक, आरोग्य कर्मचारी यांच्यासह सोपान राठोड, विक्रम राजपूत, गजानन माळी, पुंडलिक पवार, बबन पवार, रवींद्र गिरी, संयम हिवाळे, उमेश म्हस्के, अमित तडवी, अरुण चौधरी, पांडुरंग बोरसे आणि प्रमोद चऱ्हाटे यांनी विशेष सहकार्य केले. आरोग्य विभागाने केलेल्या नियोजनबद्ध अंमलबजावणीमुळे जामनेर तालुक्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम यशस्वीरीत्या पार पडली.


