अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाईसाठी निळे निशाण सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे अन्नत्याग आंदोलन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


भुसावळ तालुक्यातील दिपनगर येथिल औष्णिक विद्युत केंद्र येथे अनेक वर्षापासून प्रशासनातिल काही अधिकाऱ्यांसोबत संगनमत करून एस . पि . इंटरप्रायजेस या कंपनिने कंत्रांटी कामगारांचे आर्थिक शोषण करून शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी दिपनगर प्रशासनाचे लक्ष वेधण्याच्या दृष्टीने तसेच कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी दि . ०६ मे २०२६ रोजी दिपनगर मुख्य प्रवेशद्वारासमोर निळे निशाण कामगार संघांच्या वतिने अमरण उपोषण करण्यात आले होते. 

(ads)

परंतु दिपनगर येथे नव्याने मुख्य अभियंता पदाचा पदभार स्वीकार करणारे चौधरी साहेब यांनी संघटनेच्या कार्यकर्त्यांसोबत सकारात्मक चर्चा करून येत्या १५ दिवसाच्या चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले त्यामुळे दि . ०९ मे २०२६ रोजी शुरू असलेले आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले होते . परंतु २० ते २५ दिवसांचा कालावधी उलटून गेला तरी दिपनगर प्रशासनाने काही भ्रष्ट अधिकारी व एस . पी . इंटरप्रायजेस कंपनिला पाठीशी घालण्याच्या उद्देशाने कुठलीही कारवाई केली नाही.

(ads)

 त्या अनुषंगाने दि . ०३ जुन २०२६ पासून निळे निशाण कामगार संघाचे संस्थापक / अध्यक्ष आनंद बाविस्कर यांनी दिपनगर येथिल कंत्राटी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच काही भ्रष्ट अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल या दृष्टीने दिपनगर प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी अन्न पाणि त्याग करून आमरण उपोषणाची शुरुवात केली आहे . तरी शासन प्रशासनाने तात्काळ आंदोलनाची दखल घेऊन समस्यांचे निराकरण न केल्यास शेकडो कामगारांच्या उपस्थितित तिव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा निळे निशाण सामाजिक संघटनेचे भुसावळ तालुका अध्यक्ष दिपक लोहार , निळे निशाण कामगार संघाचे तालुका अध्यक्ष आकाश सपकाळे , रवि बाविस्कर यांनी दिला आहे .

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!