टोलनाक्यावर गँस टँकरची ट्रकला धडक : दोन जणांचा जागीच मृत्यू : जळगाव जिल्ह्यातील घटना

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


जळगाव (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील सबगव्हाण टोल नाक्याजवळ एका गॅस टँकरने दुसऱ्या ट्रकला धडक दिली. या भीषण अपघातामध्ये २ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

तर मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवण्यात आली आहे. आग लागल्यामुळे टोल नाक्यावर भीतीचे वातावरण पसरले होते.

(ads)

मिळालेल्या माहितीनुसार, जळगावमधील पारोळा तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर सबगव्हाण टोल नाक्याजवळ संध्याकाळी ही घटना घडली. टोल नाक्यावर एका गॅस टँकरने पाठीमागून एका ट्रकला धडक दिली. अपघातानंतर ट्रँकरला आग लागली. 

हेही वाचा : जळगाव जिल्ह्यात हवामान विभागाकडून पुढील ४ दिवस मुसळधार पावसाचा अंदाज ; 'या' तालुक्यांमध्ये मुसळधार बरसणार

या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर सदर गॅस टँकरला आग लागल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असताना प्रशासनाने तात्काळ दखल घेत पारोळा अग्निशामक दलाचे कर्मचाऱ्यांना तसंच रुग्णवाहिका चालकांना तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

(ads)

यावेळी पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन, नगरपालिका प्रशासन,रुग्णवाहिका प्रशासन व अग्निशामक बंबाचे कर्मचारी घटनास्थळी उपस्थित झाले आहे. याबाबत सदर अपघातामुळे आणि गॅस टँकरला लागलेला आगीमुळे सुमारे दोन ते तीन तास दुतर्फा वाहतूक ठप्प झाली होती.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!