भुसावळ पुन्हा खुनाचे हादरले रेल्वे कर्मचाऱ्याची निर्घृण हत्या; संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे



 भुसावळ शहरातील कवाडे नगर (Kawade Nagar,Bhusawal) परिसर शनिवारी (४ जुलै) सायंकाळी घडलेल्या एका धक्कादायक हत्येच्या घटनेने हादरून गेला. फिल्टर हाऊसमध्ये (Filter House)  ड्युटीवर असलेले प्रसाद यशवंत कुलकर्णी (वय ५८) यांच्यावर कोणतेही स्पष्ट कारण नसताना एका व्यक्तीने लोखंडी पट्टीने डोक्यावर वार करत गंभीर जखमी केले. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी आकाश भानुदास गोरखा (रा. कवाडे नगर, भुसावळ) याला भुसावळ शहर पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेत अटक केली आहे.

(ads)

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, प्रसाद कुलकर्णी हे नेहमीप्रमाणे फिल्टर हाऊसमध्ये आपल्या कर्तव्यावर होते. त्याचवेळी संशयित आरोपी आकाश गोरखा तेथे आला आणि कोणतेही कारण नसताना त्याने लोखंडी पट्टीने कुलकर्णी यांच्या डोक्यावर जोरदार वार केला. या अचानक झालेल्या हल्ल्यात कुलकर्णी गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

(ads)

घटनेची माहिती मिळताच भुसावळ शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला असून, घटनास्थळावरील पुरावेही ताब्यात घेतले आहेत. आरोपीला काही वेळातच अटक करण्यात आली असून त्याच्याकडे सखोल चौकशी सुरू आहे.

हेही वाचा : जळगाव जिल्ह्यात हवामान विभागाकडून पुढील ४ दिवस मुसळधार पावसाचा अंदाज ; 'या' तालुक्यांमध्ये मुसळधार बरसणार

प्राथमिक तपासात आरोपी आकाश गोरखा हा मनोरुग्ण असून त्याच्यावर ठाणे येथे उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, यासंदर्भातील वैद्यकीय कागदपत्रे आणि उपचारांचा अधिकृत तपशील पोलिसांकडून पडताळला जात आहे. त्यामुळे या माहितीची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.

(ads)

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीविरुद्ध यापूर्वी दोन गुन्हे दाखल झाले होते. मात्र, सन २०२१ नंतर त्याच्याविरुद्ध कोणताही नवीन गुन्हा नोंदविण्यात आलेला नव्हता. त्यामुळे अचानक घडलेल्या या हल्ल्यामागील नेमके कारण काय, याचा शोध पोलीस घेत आहेत.

(ads)

या घटनेमुळे कवाडे नगर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, शांत आणि मनमिळावू स्वभावाचे म्हणून ओळखले जाणारे प्रसाद कुलकर्णी यांच्या निधनामुळे नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, भुसावळ शहर पोलिसांनी आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!