ऐनपुर येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास विभागामार्फत टी . बी. फ्री इंडिया निमित्ताने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जे.बी. अंजने यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
(ads)
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उप प्राचार्य डॉ एस एन वैष्णव हे होते. तर प्रमूख वक्ते म्हणून डॉ एस ए पाटील होते. तर प्रमूख पाहुणे म्हणून डॉ.एस. बी. पाटील, प्रा. व्ही. एच. पाटील डॉ पी आर महाजन, प्रा व्हि एच पाटील, उपस्थित होते. डॉ एस ए पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनात टी.बी. मुक्त भारत झाले पाहिजे व त्याचे जीवनावर होणारे भयंकर वाईट परीणाम या विषयी मार्गदर्शन केले.
(ads)
उपप्राचार्य डॉ एस एन वैष्णव यांनी महाविद्यालयाच्या परिसरात कोणीही नशा करणार नाही याविषयी कळकळीने सांगितले आणि टी. बी हा रोग संसर्गजन्य आजार असून धूम्रपानापासून दुर राहावे त्याचे दुष्परिणामही विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. या कार्यक्रमाला डॉ एस बी पाटील, डॉ जे पी नेहेते, प्रा अंकुर पाटील, डॉ एन यु बारी उपस्थीत होते. या कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे सहायक कार्यक्रम अधिकारी प्रा.एस. पी . उमरीवाड यांनी केले.
(ads)
तर आभार प्रदर्शन विद्यार्थी विकास विभागाचे समन्वयक प्रा.एच.एम. बाविस्कर यांनी मानले.श्री श्रेयस पाटील, कु. अर्पिता चौधरी, कु. वैष्णवी महाजन, कु. प्रतिक्षा पाटील, कु. रितीका महाजन कु. श्रुतिका लवंगे कु. नेहा काठोके, कु. स्वस्तीका चौधरी, कु. तेजस्विनी महाजन, कु. नेहा महाजन, कु. पुर्वजा महाजन, कु. वेदीका पाटील, कु. श्रूती महाजन, अंकुश राठोड, श्रेयस पाटील, आणि इतर विद्यार्थ्यांनी विशेष सहकार्य केले, महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला.



