रावेर ( राहुल डी गाढे) : रावेर नगरपालिका प्रशासनाने रावेर शहरात अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेत विविध रस्ते, चौक आणि सार्वजनिक ठिकाणांवरील अतिक्रमणे हटविण्याची कारवाई केली. या मोहिमेमुळे शहरातील वाहतूक सुरळीत होण्यास आणि नागरिकांना मोकळा रस्ता उपलब्ध होण्यास मदत होणार असली, तरी दुसरीकडे हातगाडी, फेरीवाले आणि लघु व्यावसायिकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे.
(ads)
दिवसभर कष्ट करून कुटुंबाचा उदरनिर्वाह कसामसा करणाऱ्या अनेक छोट्या व्यावसायिकांची दुकाने व हातगाड्या हटविण्यात आल्याने त्यांच्यासमोर रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. "अतिक्रमण हटविणे आवश्यक आहे, मात्र पर्यायी जागा उपलब्ध करून देत कारवाई झाली असती तर त्यांचेवर उपासमारीची वेळ आली नसती," अशी भावना अनेक व्यावसायिकांनी व्यक्त केली.
(ads)
नागरिकांच्या मते, शहर सुशोभीकरण आणि वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी अतिक्रमण हटविणे आवश्यक असले, तरी गरीब व लघु व्यावसायिकांचे पुनर्वसन करून त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून देणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
(ads)
आता रावेर नगरपालिका प्रशासन याबाबत काय निर्णय घेते आणि प्रभावित व्यावसायिकांना दिलासा देण्यासाठी कोणती उपाययोजना करते, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
अतिक्रमण काढण्यास प्रशासनाची तत्परता : परंतु नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यास असमर्थ
रावेर शहरात गेल्या दोन ते तीन दिवसापासून अतिक्रमण मोहिमही राबवली जात आहे.तेही एका निष्पाप महिलेचा एका ट्रक खाली येऊन मृत्यू झाल्यामुळे रावेर नगरपालिका आणि पोलिस प्रशासनाला अचानक अतिक्रमण काढण्या ची जाग आली.आतापर्यंत झोपेचे सोंग घेण्याचे काम प्रशासन करत होते.
(ads)
अतिक्रमण काढण्या साठी जशी तत्परता दाखवली तशीच तत्परता रावेर शहराला गेल्या २-३ वर्षापासून विविध कॉलनी,परिसर हे रावेर नगर परिषदेमध्ये समाविष्ट झाल्या आहेत. त्यांच्याकडून अव्वा च्या सव्वा घरपट्टी वसूल करूनही कॉलनी परिसरात रस्ते नाही,गटारी नाही,स्ट्रीट लाईट नाही, भरमसाट आकारण्या करून नगरपालिका प्रशासन नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यास असमर्थ ठरत आहे.


