रावेर शहरात दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन इसमांना हत्यार व मुद्येमालसह रावेर पोलीसांनी केले जेरबंद

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : दि. ०९/०७/२०२६ रोजी रावेर पोलिस स्टेशन चे पो. हे. कॉ इश्वर चव्हाण हे पाल दुरक्षेत्र येथे कर्तव्यावर असतांना त्यांना गुप्तबातीमीदाराव्दारे खात्रीशीर माहीती मिळाली की, पाल गावात एक पांढऱ्या रंगाची ईको चारचाकी वाहन येत असुन त्यात अंदाजे ०५ ते ०६ इसम हे पाल गावात संशयीतरित्या फिरत आहे व ते वाहन हे रावेर शहराकडे सुसाट जात आहे.

(ads)

सदर मिळालेल्या माहीतीनुसार रावेर पोलिस स्टेशन वे पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांनी लागलीच रावेर गुन्हे शोध पथकाला योग्य त्या सुचना देवुन रावेर कडुन पाल कडे रवाना केले व एक पथक पाल कडुन रावेर कडे पाठविले. आभोडा गावाजवळ सदरचे वाहन हे मोटारसायकलींना कट मारुन पुढे जात असतांना गुन्हे शोध पथकास निर्दशनास दिसले व त्यांना पोलिसांचा सुगावा लागताच ते वाहन हे बेदरकारपणे चालवुन रावेर शहराकडे भरधाव वेगाने येत होते. नंतर वाहन हे रावेर शहरातील आठवडे बाजाराच्या दिशेने जावुन बऱ्हाणपुर रोड वरील एका शेताजवळ घाई घाईत पळुन जाण्याचा प्रयत्न करीत असतांना चिखलात फसले या दरम्यान त्यांच्या मागे पोलिसांसह इतर १५ ते २० इसमांचा जमाव ही पाठलाग करीत होता व त्यांचे वाहन फसल्याचे पाहुन जमावाने त्यांच्या गाडीजवळ जावुन त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला परंतु त्यातील इतर इसम हे शेतशिवाराचा फायदा घेवुन पळुन जाण्यात यशस्वी झाले व इतर दोन इसम हे जमावाच्या हाती लागले होते पोलीस पोहचे पर्यंत जमावाने त्यांच्यावर हल्ला करुन जखमी केलेले होते. पोलीसांनी वेळेच गांभीर्य लक्षात घेता त्यांना लागलीव जमावातुन सोडवुन ऑटो रिक्षाने रावेर ग्रामिण रुग्णालय येथे पुढील उपचाराकरीता दाखल केले.

(ads)

सदर इसमांवर रावेर पोलिस स्टेशन येथे गुरंन- ३४२/२०२६ भा. न्या. संहीता कलम ३१० (४) (५), शस्त्र अधिनियम कलम ०४,२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर इसमांना विश्वासात घेवुन विवारपुस केली असता ते काही एक सांगण्यास तयार नव्हते व उडवाउडवीची उत्तरे देत होते परंतु सदर इसमांच्या वाहनावी तपासणी केली असता सदर वाहनातुन

(ads)

एक लोखंडी तलवार, पेंचीस, टॉमी, लाल मिर्च पुड, दोरखंड, व ५०० रपये दराच्या ३०००००/-रुपये किमतीच्या चिल्ड्रन बँकेच्या नकली नोटा तसेच मारुतु सुझुकी कंपणीची इको गाडी जिचा क्रमांक - MH-19-EA-2403 असे मुद्येमाल पंचनामा करुन जप्त करण्यात आलेला असुन सदर चे आरोपी हे रावेर शहरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपीतांनी त्यांच्या इतर साथीदारांची माहीती पोलिसांना दिलेली आहे.

(ads)

आरोपीतांची माहीती- ०१) निखील प्रविण पाटील वय- २००२) अल्ताफ जलाल शेख वय २६ दोघी रा साईनगर, घोडबंदर रोड कासार वडवली जि.ठाणे. फरार आरोपी मेहरबान जहांगीर तडवी रा पाल व त्याचे दोन साथीदार नांव गाव माहीत नाही.


सदर आरोपीतांकडुन अजुन गुन्हे बाहेर येण्याची शक्यता आहे. आरोपीतांना मा. न्यायालयात हजर करीत असुन त्यांची पोलीस कोठडीची मागणी करीत आहोत. आरोपीतांकडे गुन्हा कोठे करणार होते ? कोण कोण करणार होते ? या बाबत सखोल तपास चालु आहे.

(ads)

सदर कार्यवाही ही मा. श्रीकांत धिवरे सो पोलिस अधिक्षक जळगांव, मा. श्री संदीप गावीत सो अपर पो. अधिक्षक जळगांव परीमंडळ, तसेच मा. श्री अनिल बडगुजर पोलिस उपअधिक्षक फैजपुर विभाग यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली रावेर पोलिस स्टेशन वे पो.नि. संदीप पाटील, पो.उप. निरीक्षक मनोज महाजन, पो.उप. निरीक्षक तुषार पाटील तसेव गुन्हे शोध पथकातील पो.हे.कॉ समाधान ठाकुर, इश्वर चव्हाण, सुनिल वंजारी, श्रीकांत चव्हाण, प्रमोद पाटील, विशाल पाटील, सुकेश तडवी, संतोष हदा यांनी केली आहे. गुन्हयाचवा पुढील तपास हा पो.उप. निरीक्षक तुषार पाटील हे करीत आहेत.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!