अर्थशास्त्र विभागाची दमदार कामगिरी; एम.ए. अर्थशास्त्रचा १०० टक्के निकाल

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे



ऐनपूर : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या वतीने घेण्यात आलेल्या विद्यापीठ परीक्षांच्या निकालात ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागाने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तृतीय वर्ष कला शाखेसह एम.ए. अर्थशास्त्र पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी गुणवत्तापूर्ण कामगिरी करत विभागाच्या शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे.

(ads)

तृतीय वर्ष कला शाखेच्या परीक्षेत ऋतिका सुरेश गवळी हिने ८०.८५ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. संजना विनोद भालेराव हिने ७९.६४ टक्के गुण मिळवत द्वितीय, तर संजना सुनील वाघ हिने ७७.५२ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळविला.

(ads)

एम.ए. अर्थशास्त्र पदव्युत्तर अभ्यासक्रमातही विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केले. वृषाली गोकुळ पाटील हिने ८३.६४ टक्के गुणांसह प्रथम क्रमांक मिळविला. भारती गणेश महाजन हिने ७६.०९ टक्के गुणांसह द्वितीय, तर हरी कडू पाटील यांनी ७४.२७ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला.

(ads)

एम.ए. अर्थशास्त्रचा १०० टक्के निकाल


एम.ए. अर्थशास्त्र द्वितीय वर्षाच्या परीक्षेला प्रविष्ट झालेल्या १८ पैकी सर्व १८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे विभागाचा १०० टक्के निकाल लागला आहे. विद्यार्थ्यांची मेहनत, नियमित अभ्यास आणि प्राध्यापकांचे मार्गदर्शन यामुळे हे यश मिळाल्याचे सांगण्यात आले.

(ads)

या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने, अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा. विलास पाटील तसेच प्रा. ज्ञानेश्वर कोळी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांनी भविष्यातही अशीच उत्कृष्ट कामगिरी करून महाविद्यालयाचा नावलौकिक वाढवावा, अशा शुभेच्छा त्यांनी व्यक्त केल्या.

(ads)

विद्यार्थ्यांच्या या यशामुळे सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागाच्या शैक्षणिक गुणवत्तेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!