आरक्षण उपवर्गीकरण विरोधी जनजागृती अभियानाला रावेर तालुक्यात उधाण : १० ऑगस्टच्या मोर्चासाठी गावोगावी पेटली वज्रमूठ

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 आरक्षण उपवर्गीकरण विरोधी जनजागृती अभियानाला रावेर तालुक्यात उधाण : १० ऑगस्टच्या मोर्चासाठी गावोगावी पेटली वज्रमूठ


रावेर (राहुल डी गाढे)

आरक्षण उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात समाजात व्यापक असंतोष पसरला असून, या विरोधात वज्रमूठ आवळण्यासाठी रावेर तालुक्यात जनप्रबोधनाचा एल्गार पुकारण्यात आला आहे. ‘आरक्षण उपवर्गीकरण विरोधी सामाजिक कृती समिती’**च्या वतीने संपूर्ण रावेर तालुक्यात धुवांधार जनजागृती अभियान राबवले जात असून, आगामी १० ऑगस्ट रोजी निघणाऱ्या भव्य मोर्चासाठी रावेर तालुक्यातील गावोगावी जोरदार प्रचार-प्रसार सुरू आहे.

(ads)

संविधानिक आरक्षणाचे संरक्षण आणि सामाजिक हक्कांच्या रक्षणासाठी समितीचे पदाधिकारी, ज्येष्ठ समाजबांधव, सामाजिक कार्यकर्ते, महिला व युवक मोठ्या संख्येने मैदानात उतरले आहेत. तालुक्यातील कानाकोपऱ्यात जाऊन बैठका, चर्चासत्रे आणि प्रत्यक्ष गृहभेटींच्या माध्यमातून उपवर्गीकरणाचे दुष्परिणाम नागरिकांना समजावून सांगितले जात आहेत. या अभियानाला प्रत्येक गावातून समाजबांधवांचा उत्स्फूर्त आणि अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे.

(ads)

१० ऑगस्टला रावेरमध्ये धडकणार अभूतपूर्व मोर्चा!

येत्या १० ऑगस्ट २०२६ रोजी रावेर शहरात एक ऐतिहासिक आणि भव्य मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या मोर्चात संपूर्ण तालुक्यातील नागरिकांनी हजारोच्या संख्येने सहभागी व्हावे, यासाठी समितीचे कार्यकर्ते रात्रं-दिवस एक करत आहेत. "हा केवळ एक मोर्चा नसून समाजाच्या भविष्याची आणि संविधानिक अधिकारांची लढाई आहे," असा सूर गावोगावच्या बैठकांमध्ये उमटत आहे.

(ads)

कार्यकर्त्यांच्या योगदानाचा गौरव

कोणत्याही स्वार्थाशिवाय, रणरणत्या उन्हात आणि प्रतिकूल परिस्थितीतही गावोगावी जाऊन जनजागृती करणाऱ्या सर्व ज्येष्ठ-श्रेष्ठ समाजबांधव, महिला, युवक व पदाधिकाऱ्यांचे सामाजिक कृती समितीच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार व्यक्त करण्यात आले आहेत.

(ads)

कृती समितीचे जाहीर आवाहन:

"समाजाच्या हक्कांवर होणारे अतिक्रमण रोखण्यासाठी, संविधानिक आरक्षणाच्या संरक्षणासाठी आणि सामाजिक एकजूट दाखवून देण्यासाठी प्रत्येक नागरिकाने १० ऑगस्ट रोजी रावेर येथील मोर्चात आपल्या कुटुंबासह व सहकाऱ्यांसह मोठ्या संख्येने सहभागी व्हा


#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!