रावेर / यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा दारुचा जुगार अड्डयांचा महापुर ; अनेक संसार ह्या महापुरात वाहुन जाण्याची /उद्धवस्त होण्याची दाट शक्यता

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


जुगार अड्ड्यांवर लाखों रुपयांची उलाढाल..

जिल्हा पोलीसांनी तात्काळ दखल घेण्याची गरज..

जळगाव (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : रावेर / यावल तालुक्यातील अनेक महिन्यांपासून अवैध धंद्यांचा महापुर आला आहे याकडे पोलीस प्रशासनाचे जाणिव पुर्वक दुर्लक्ष होत असल्याचा जनतेचा आरोप आहे. वेळोवेळी विविध संघटनांमार्फत निवेदने देऊन देखील परिस्थिती जैसे थे दिसत आहे या गंभीर समस्येकडे लक्ष कोणता वरिष्ठ अधिकारी देणार याकडे सध्या जळगाव जिल्हाच्या जनतेचे लक्ष लागुन आहे,रावेर तालुक्यातील सातपुडा पायथ्याशी असलेल्या आभोडा कुसुंबा परिसरासह रावेर निंभोरा सावदा फैजपूर न्हावी परिसरात अवैध धंद्यांना देखील महापुर आला आहे.. रावेर तालुका केळी उत्पादक शेती म्हणून भारतात प्रसिद्ध तालुका म्हणून ओळखला जातो ह्या भागात केळीचे जास्त उत्पादन होत असल्याने मजुरांना देखील हजारो रुपये मजुरी मिळते मात्र ह्या मजुरीत आपला संसार गाडा न चालवता हे व्यसनाधिन जुगारी,दारुडे कमावलेल्या मजुरीत मुलांचे कुटुंबाचे पालन पोषण न करता जुगार अड्डा अवैध धंद्यांवाल्यांचा फायदा करीत असल्याचे परिसरातील जनतेकडुन बोलले जात आहे,ह्या जुगाराच्या व्यसनात अडकलेली तरुण पीढी दिवसेंदिवस दारु पिऊन जुगार खेळुन आपल्या मुला बाळांना उपासमारीची वेळ आणत असल्याचे चित्र दिवसेंदिवस वाढतच चालले आहे.तेरी भी चुप और मेरी भी चुप अशी परिस्थिती असल्याने कारणाने पोलीस आणि जुगार अड्डडे अवैध धंदे वाल्यांमध्ये घट्ट नाते जुळल्याची जोरदार चर्चा जळगाव जिल्ह्यात वाऱ्या सारखी पसरली आहे.

(ads)

संबंधित पोलीस ठाण्यांचे पोलीस अधिकारी.बीट हवालदार हे जनतेचे रक्षक नसुन पैशांचे भक्षक झाले की काय ? असेही रावेर यावल तालुक्यातील जनतेकडुन महिलांकडुन शेतकऱ्यांकडुन ऐकवण्यास मिळत आहे..भाड मे जाए जनता और अपना काम बनता अशी  स्थिती झाली असल्याने पोलीस प्रशासनावर गंभीर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.

(ads)

या अवैध जुगार अवैध दारू सारख्या धंद्यांना परिसरातील जनता खुप वैतागली आहे आणि जनतेचा पोलीसांवरचा विश्वास हा कमी होत असल्याचेही चित्र दिसत आहे..तसेच ह्या परिसरात सुरु असलेल्या जुगार अड्डे अवैध धंद्यांमुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत..अनेकांचे संसार उद्धवस्त होण्यापासून वाचवावे अशी ही आस जिल्हा पोलिस अधीक्षक साहेब यांचेकडे जनता ठेवत की आमचे संसार जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब वाचवतील ,तरी जिल्हा पोलिस अधीक्षक साहेब यांनी गांभीर्याने या जुगार अड्डे दारु अड्ड्यांवर लक्ष देऊन कायमस्वरूपी जुगार अड्डे अवैध धंदे बंद करावेत आणि अवैध धंदे जुगार अड्ड्यावाल्यांवर दंडात्मक कारवाई करावी अशी रास्त स्वरुपाची मागणी रावेर यावल तालुक्यातील जनतेकडुन..महिलांकडुन . शेतकऱ्यांकडुन जिल्हा पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली आहे...जर रावेर यावल तालुक्यातील अवैध धंदे बंद न झाल्यास रावेर यावल तालुक्यातील जनतेकडुन लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील रावेर यावल तालुक्याच्या जनतेने पोलीस प्रशासनाला दिला आहे

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!