नेरी बुद्रुकमध्ये खड्ड्यांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे रास्ता रोको; १० दिवसांचा अल्टिमेटम

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


जळगाव जिल्हा प्रतिनिधी (नितीन इंगळे) 

नेरी बुद्रुक : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753F वर पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यांमुळे सातत्याने अपघातांचा धोका निर्माण झाला असून, प्रशासनाचे याकडे लक्ष वेधण्यासाठी आज दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी नेरी बुद्रुक येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार)च्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

(ads)

रस्त्याची अक्षरशः दुरवस्था झाली असून मोठमोठे खड्डे वाहनचालकांसाठी जीवघेणे ठरत आहेत. राज्याचे मोठमोठे मंत्री आणि अधिकारी याच मार्गावरून नियमित प्रवास करतात, मग एखाद्याचा जीव गेल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? असा संतप्त सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला.

(ads)

सुरुवातीला हे आंदोलन केवळ प्रशासनाला जागे करण्यासाठी शांततेच्या मार्गाने आणि छोटेखानी स्वरूपात करण्याचा मानस होता. मात्र, आंदोलनादरम्यान रस्त्यावर थांबलेल्या सामान्य नागरिकांनी उत्स्फूर्तपणे आंदोलनात सहभाग घेतल्याने आंदोलनाला मोठे स्वरूप प्राप्त झाले.

(ads)

यावेळी आंदोलनकर्त्यांनी प्रशासन आणि सरकारला स्पष्ट इशारा देत येत्या दहा दिवसांत महामार्गावरील खड्डे बुजवून रस्ता सुरक्षित करण्यात यावा; अन्यथा यापेक्षाही मोठे आंदोलन उभारून हा महामार्ग पूर्णतः बंद करण्यात येईल,” अशी विनंतीवजा सूचना दिली.

(ads)

नागरिकांच्या जीविताशी संबंधित असलेल्या या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन महामार्गाची दुरुस्ती करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. आता प्रशासन या इशाऱ्यानंतर नेरी बुद्रुक परिसरातील महामार्गाच्या दुरवस्थेबाबत काय निर्णय घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!