वर्धा | प्रतिनिधी : वर्धा येथील फिनिक्स अकॅडमीचे संचालक तथा बहुजन विचारांचे कार्यकर्ते नितेश कराळे गुरुजी यांच्या अटकेच्या प्रकरणाला आता महत्त्वाचे वळण मिळाले आहे. कराळे गुरुजी यांच्यावर करण्यात आलेले आरोप चुकीचे असून, त्यांच्यावर राजकीय दबावातून कारवाई करण्यात आल्याचा दावा त्यांच्या समर्थकांकडून करण्यात येत आहे.
(ads)
या प्रकरणात नितेश कराडे गुरुजी यांना अटक करण्यात आली असून ते सध्या वर्धा कारागृहात आहेत. त्यांच्या जामिनासाठी तसेच न्यायालयीन लढ्यासाठी समता सैनिक दल, हेडक्वार्टर दीक्षाभूमी, नागपूर यांच्या वतीने कायदेशीर प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.
(ads)
याच पार्श्वभूमीवर समता सैनिक दलाच्या पदाधिकाऱ्यांनी व सहकाऱ्यांनी वर्धा कारागृहात जाऊन नितेश कराडे गुरुजी यांची भेट घेतली. यावेळी प्रकरणाची सद्यस्थिती, जामीन प्रक्रिया तसेच पुढील न्यायालयीन रणनीतीबाबत चर्चा करण्यात आली.
३१ ऑगस्टला न्यायालयात सुनावणी
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ रोजी वर्धा जिल्हा न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. कराडे गुरुजी यांना जामीन मिळावा यासाठी कायदेशीर पातळीवर प्रभावीपणे बाजू मांडण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
या भेटीदरम्यान ॲड. आकाश मून, ॲड. स्मिता कांबळे, प्रितम प्रियदर्शी, स्वप्नील हामणे, ॲड. गुरुराज राऊत (वर्धा) तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रवीण कांबळे उपस्थित होते.
(ads)
निष्पक्ष चौकशीची मागणी
नितेश कराडे गुरुजी यांच्यावर करण्यात आलेले आरोप आणि त्यांच्यावरील पोलीस कारवाईची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांच्या समर्थकांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, या प्रकरणातील आरोपांबाबत अंतिम सत्य न्यायालयीन प्रक्रियेतूनच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे ३१ ऑगस्ट रोजी होणाऱ्या सुनावणीकडे वर्ध्यासह सामाजिक आणि बहुजन चळवळीतील कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.


