आदिवासी समाजाचे पर्यावरण संवर्धनासाठी मोठे योगदान : डॉ. एस. पी. उमारीवाड

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


ऐनपूर : सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय, ऐनपूर येथे विद्यार्थी विकास विभाग, राष्ट्रीय सेवा योजना व समान संधी केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांती दिवस व जागतिक आदिवासी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. पी. आर. महाजन होते.

(ads)

यावेळी प्रमुख वक्ते म्हणून डॉ. एस. पी. उमारीवाड, डॉ. एस. ए. पाटील व डॉ. जे. पी. नेहेते उपस्थित होते. मार्गदर्शन करताना डॉ. एस. पी. उमारीवाड यांनी आदिवासी समाजाचे पर्यावरण संवर्धनातील योगदान अधोरेखित केले. आदिवासी समाजाची जीवनशैली ही निसर्गाशी घट्ट जोडलेली असून, जल, जंगल व जमीन यांचे संरक्षण करण्याची परंपरा त्यांच्या जीवनपद्धतीत रुजलेली आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच आदिवासी समाजाच्या जीवनशैलीविषयी सविस्तर माहिती दिली.

(ads)

डॉ. एस. ए. पाटील यांनी क्रांती दिवस साजरा करण्यामागील उद्देश व त्याचे ऐतिहासिक महत्त्व स्पष्ट केले. डॉ. जे. पी. नेहेते यांनी इतिहासातील प्रत्येक दिवसाला विशेष महत्त्व असते. त्याचप्रमाणे क्रांती दिवसाचेही ऐतिहासिक महत्त्व असून, या दिवसामागील प्रेरणा आणि संघर्षाची माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली.

(ads)

अध्यक्षीय भाषणात डॉ. पी. आर. महाजन यांनी क्रांती दिवस साजरा करण्यामागील भूमिका स्पष्ट केली. क्रांतीच्या माध्यमातून इंग्रजांच्या राजवटीला मोठा हादरा बसला होता. स्वातंत्र्याच्या लढ्यात आदिवासी बांधवांनीही मोठे योगदान दिले असून, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी निसर्ग व पर्यावरणाचे जतन केले, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. हेमंत बाविस्कर यांनी केले, तर राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. व्ही. एन. रामटेके यांनी आभार मानले.

(ads)

कार्यक्रमास डॉ. एस. बी. पाटील, व्ही. एच. पाटील, प्रा. एस. आर. इंगळे, डॉ. डी. बी. पाटील, डॉ. एस. एस. साळुंखे यांच्यासह महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्री. हर्षल पाटील व श्री. श्रेयस पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!