रावेर(सुवर्ण दिप वृत्तसेवा) :
नाशिक येथे दि. 26 व 27 सप्टेंबर 2026 रोजी आयोजित विभागीय शालेय तायक्वांडो स्पर्धेत रावेरच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत पदकांची लक्षणीय कमाई केली.
या स्पर्धेत प्राची पाटील (स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, रावेर), रोशन गाढे (सरदार जी. जी. हायस्कूल, रावेर) आणि अमर शिवलकर (यशवंत महाविद्यालय, रावेर) यांनी सुवर्णपदक पटकावत आपले कौशल्य सिद्ध केले.
तसेच लावण्या पाटील हिने रौप्यपदकाची कमाई केली. कांस्यपदक विजेत्यांमध्ये सम्राट घुमळकर, भूमिका महाजन, खुशी पाटील आणि जिअना टी. मनू यांचा समावेश आहे.
या स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर तीन खेळाडूंची राज्यस्तरीय शालेय तायक्वांडो स्पर्धेसाठी निवड झाली असून, ही रावेर तालुक्यासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.
या यशाबद्दल स्वामी स्पोर्ट क्लब तथा रावेर तायक्वांडो अकॅडमीचे प्रशिक्षक जीवन महाजन, जयेश कासार व नमिता सुरवाडे, तसेच संघ व्यवस्थापक जे. के. पाटील सर, लक्ष्मी अस्वार मॅडम, हर्षाली पवार मॅडम मार्गदर्शन लाभले तर स्वामी स्पोर्ट क्लबचे अध्यक्ष रवींद्र पवार सर, राजू पवार सर, धांडे मॅडम, श्रीकांत महाजन सर, रावेर तालुका तायक्वांडो संघटनेचे अध्यक्ष डॉ. संदीप पाटील सर, दीपक नगरे, डॉ. सुरेश महाजन तसेच जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनचे सचिव अजित घारगे यांनी खेळाडू, प्रशिक्षक व पालकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


