रावेर(सुवर्ण दिप वृत्तसेवा) : महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने आयोजित पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ आज रावेर येथील श्री विठ्ठलराव शंकरराव नाईक कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे ऑनलाईन आभासी उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथून करण्यात आले. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग जळगाव आणि श्री विठ्ठलराव शंकरराव नाईक कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय रावेर यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला स्वातंत्र्यवीर गोविंदरावजी वैद्य शासकीय आयटीआय रावेर यांचे यावेळी सहकार्य लाभले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान रावेर परिसर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आदरणीय हेमंत शेठजी नाईक यांनी भूषविले. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून रावेर नगरीच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. संगिता भास्कर महाजन, यांची उपस्थिती लाभली. प्राचार्य डॉ. अनिल पाटील, पोलीस निरीक्षक संदीप पाटील, श्री.भास्कर महाजन यांनी नोकरी इच्छुक युवक युवतींना अनमोल मार्गदर्शन केले, विद्यार्थ्यांनी कौशल्य विकसित करून स्वतःला सुसज्ज ठेवावे व नोकऱ्यांच्या अनेक संधी काबीज करून यशस्वी व्हावे असा संदेश यावेळी देण्यात आला. यावेळी नगरसेविका सौ. अर्चना पाटील, नगरसेविका सौ. योगिता महाजन आणि नगरसेविका सौ. प्रमिला पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मा. संदीप गायकवाड,आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र जळगाव, यांचे यावेळी मार्गदर्शन लाभले.
या रोजगार मेळाव्यास डॉ प्रतीकशेटजी नाईक, श्री युवराज बिरपन कार्यालयीन अधीक्षक, नोडल अधिकारी डॉ. सी.पी. गाढे, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे श्री जसपालसिंग गिरासे, शासकीय आयटीआय रावेर येथील प्र. प्राचार्य श्री एम.पी.पवार,रावेर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.संदीप धापसे, उपप्राचार्य प्रा.एस.यु.पाटील, डॉ.बी.जी.मुख्यदल,डॉ.एस.बी.धनले, आयटीआयचे नोडल अधिकारी श्री व्ही.आय. पाटील आणि श्री एस. एम.भालेराव यांचे यावेळी अनमोल मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.सी.पी. गाढे यांनी केले प्रास्ताविक श्री जसपाल सिंग गिरासे यांनी केले तर आभार श्री संजय भालेराव सर यांनी व्यक्त केले.
या रोजगार मेळाव्यास द ग्रीन जेनेसिस कंपनीच्या सौ रोहिणी बढे ,क्रिस क्रॉप कंपनीचे श्री अतुल गणेकर , डेक्कन सेल्स कंपनीचे श्री गोपाल पाटील,त्रिमूर्ती इंजिनिअर चे श्री श्रीराम चौधरी व श्री रवींद्र बारी, एन सी सी कंपनीचे श्री प्रशांत पाटील,जोगेश्वरी ऍग्रो चे श्री नितीन चौधरी, एलआयसी इंडिया चे श्री सिद्धांत पाटील,बंधन बँक चे श्री.रामेश्वर माळकर या सर्व कंपनीच्या प्रतिनिधींनी बेरोजगार युवक युवतींच्या यशस्वीरित्या मुलाखती घेऊन योग्य उमेदवाराची निवड केली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. मनोहर तायडे,प्रा.योगेश मावळे, प्रा. तेजस दसनूरकर, प्रा.व्हि.डी.जोशी, प्रा. सागर महाजन, प्रा. एल.एम. वळवी, प्रा. मनीष महाजन, जयेश बढे, रितिक गाढे,प्रसाद महाजन, मेहरबान तडवी यांनी परिश्रम घेतले.
यावेळी तालुक्यातील बहुसंख्य रोजगार इच्छुक युवक युवतींनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन या रोजगार महाकुंभामध्ये सहभाग नोंदविला .या मेळाव्यात नामांकित कंपन्यांनी एकशे वीस पेक्षा पदांसाठी मुलाखती घेतल्या.


